अमृत योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करा

कल्याण : अमृत योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांसाठी पाणी पुरवठा योजनेचे काम केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत अमृत मिशन योजनेअंतर्गत सुरू आहे. ही योजना डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. हे लक्ष गाठण्यासाठी योजनेला गतिमानता आणणे व योजनेतील अडथळे दूर करणे तसेच प्रत्यक्ष कामाचा वेग वाढविणे गरजेचे आहे.


यासाठी महापालिका आयुक्तांनी आज या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गोळवली, दावडी, कोळे, काटई ,संदप, सागाव येथील जलकुंभांची व टॅपिंग एकच्या साठी जोडणीसाठी सुरू असलेल्या एक हजार मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनच्या कामाची ठेकेदार, प्रतिनिधी, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.


तसेच आयुक्तांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून कामाच्या प्रगतीचा बारचार्ट घेऊन त्याप्रमाणे दर दहा दिवसांनी आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात येईल व प्रगती किती झाली याची पाहणी करण्यात येईल अशा सूचना दिल्या.


या पाहणी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे, अमृत योजनेचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Chandivali Accident : चांदिवलीत भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; 4 जण जखमी, महिला चालक पोलिसांच्या ताब्यात

Mumbai News: मुंबईतील चांदिवली परिसरातील नहार शक्ती विभागात कारने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! धारावीकरांना दिलासा; सायन उड्डाणपुलावरून 28 महिन्यांनंतर BEST बस धावणार

मुंबई: सायन आणि धारावीकरांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बस पुन्हा 28

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील सुरत कनेक्शन समोर; मुंबई क्राइम ब्रँचने 2 बंदुका, 10 काडतुसे जप्त

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.

DRI ची मुंबई विमानतळावर मोठी कारवाई! 2.29 किलो सोने जप्त, चौघांना ठोकल्या बेड्या

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीला महसूल

Mumbai Bomb Threat : महापौर रितू तावडे यांचे कार्यालय आणि अमेरिकन स्कूलला बॉम्बची धमकी; अमिताभ बच्चन अन् दिलजीत दोसांझ यांच्या नावाचाही उल्लेख

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक अत्यंत खळबजनक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे

Mumbai ATS : मुंबईत ATS ची मोठी कारवाई; जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून माहिममधून तरुणाला अटक

Mumbai News: मुंबईतील माहिम परिसरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) कारवाई करत 33 वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक