शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात?

आदित्यच्या खास माणसाला पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन उचलले


मुंबई : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होत आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरेंच्या खास माणसाला पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन उचलले आहे. मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय युवासेनेचा पदाधिकारी साईनाथ दुर्गे याला अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हा मुंबईबाहेर होता. सोमवारी सकाळी तो मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे याला ताब्यात घेतले. त्यामुळे आता याप्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, 'मातोश्री' या फेसबुक पेजवरुन शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा रोड शोमधील एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी रविवारी रात्री कल्याणमधून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले होते. यानंतर आता साईनाथ दुर्गे याला अटक करण्यात आली आहे.


साईनाथ दुर्गे युवासेनेचा कार्यकारिणीचा सदस्य होता. याशिवाय, त्याने मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण समितीमध्येही काम केले आहे. मातोश्री या फेसबुक पेजवरुन शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशीत साईनाथ दुर्गे काय जबाब नोंदवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. साईनाथ दुर्गे हा सध्या दहिसर पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत याप्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.


शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटाविरोधात रान उठवले आहे. शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडिओ मॉर्फ करण्यात आल्याचा दावा करत पोलिसांत धाव घेतली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शीतल म्हात्रे यांना खडे बोल सुनावले होते. शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओशी आमचा कोणताही संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर हात टाकत असाल तर हे कायद्याला धरुन नाही. हा व्हिडिओ खरा आहे किंवा खोटा आहे, याचा तपास करावा. व्हिडिओ खरा असल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.


तर प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. राजकीय हेतूने माझ्या वडिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचदृष्टीने मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. राजकीय वैमनस्यातून हा सगळा प्रकार सुरु आहे. संबंधित आरोपींविरोधात लवकरात लवकर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी राज सुर्वे यांनी केली.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने