Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

सिद्धिविनायक मंदिराजवळील राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला शासनाची मान्यता मिळाली आहे. या व्यवहारांतर्गत 13 निवासी सदनिका आणि 7 व्यावसायिक गाळे खरेदी करण्यात येणार असून, मालमत्तेचे एकूण मूल्य 94.11 कोटी रुपये आहे.

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेतील 13 निवासी सदनिका आणि सात व्यावसायिक जागा खरेदी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या खरेदीसाठी 94 कोटी 11 लाख 65 हजार 550 रुपये खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या खरेदीसह मुद्रांक, नोंदणी आणि अन्य अनुषंगिक खर्चही मंदिर न्यासाच्या उपलब्ध निधीतून करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


राज्याच्या विधी व न्याय विभागाने गुरूवारी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला. मंदिरातील भाविकांची वाढती गर्दी आणि उपलब्ध जागेच्या मर्यादा लक्षात घेऊन राम मेन्शनच्या खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याचे या जीआर मध्ये नमूद करण्यात आले आहे. या सर्व खरेदीसाठी न्यासाचा निधी वापरला जाणार असल्याने या व्यवहाराचा आर्थिक भार राज्य सरकारवर पडणार नाही, असेही जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. राम मेन्शनमधील 13 निवासी सदनिका खरेदी करण्यासाठी सदनिकाधारकांचे चटई क्षेत्र आणि त्यावर 40 टक्के वाढीव चटई क्षेत्र यांची गणना करून प्रतिचौरस फूट 66 हजार रुपये या दराने किंमत निश्चित करण्यात आली आहे. सात व्यावसायिक जागांसाठी संबंधित चटई क्षेत्राच्या आधारे प्रतिचौरस फूट एक लाख 11 हजार रुपये या दराने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ 708 चौरस मीटर इतके आहे.



दरम्यान, या खरेदी व्यवहारासाठी शासनाने विविध अटी घातल्या आहेत. मालमत्तेची खरेदी करण्यापूर्वी शासकीय भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच मालमत्तेच्या मालकी हक्कांची, हस्तांतरणाच्या अधिकारांची, कर्ज किंवा अन्य बोजांची आणि न्यायालयीन वादांची सक्षम विधिज्ञामार्फत तपासणी करावी लागणार आहे. मालमत्ता हस्तांतरणास पात्र असल्याची खात्री झाल्यानंतरच व्यवहार पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मालमत्तेचा प्रत्यक्ष व निर्वेध ताबा न्यासाला मिळाल्यानंतरच विक्रेत्यांना संपूर्ण खरेदी किंमत अदा करता येईल. ही रक्कम नोंदणीकृत दस्तऐवजांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित विक्रेत्यांच्या प्रमाणित बँक खात्यात आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे जमा करावी लागेल. रोख स्वरूपात कोणतीही रक्कम देण्यास मनाई करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.