देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार पुढे, सुमारे दोन हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस दिवसेंदिवस झपाट्याने पसरत आहे. देशात सुमारे दोन हजार नवे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा १० हजार ३०० च्या पुढे गेला आहे. देशात आज १८०५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे १५०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सातत्याने वाढत्या कोरोनाबाधितांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ९३२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच मागील २४ तासांत १८०५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा दर ०.०२ टक्के आहे. देशात


कोविड विषाणू संसर्ग अजूनही सुरुच आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे.


दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा या दुहेरी आजाराला लोक बळी पडत आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. H3N2 फ्लूच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे.


H3N2 आणि कोरोना हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण यांसह दोन्ही व्हायरसची लक्षणे सारखी आहेत. जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाला असेल, तर त्याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीत योग्य उपचार घ्या आणि खबरदारी बाळगा.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचार पद्धतीबाबत नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. बॅक्टेरिअल इन्फेक्शन नसेल तर अँटीबायोटीक औषधं देणं टाळण्यास सांगितलं आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोनाच्या रूग्णांच्या उपचारांसाठी 'लोपीनाविर-रिटोनावीर', 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन', 'आयव्हरमेक्टिन', 'मोलनुपिराविर', 'फॅविपिरावीर', 'अझिथ्रोमायसिन' आणि 'डॉक्सीसायक्लिन' यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत, असं सांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Captain Smit Machchhar: 174 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित माच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

नवी दिल्ली: इस्त्राईल- तेल अवीवला घेऊन जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर

Trade Agreement : भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात; लवकरच अंतरिम करार पूर्ण होण्याची शक्यता

नवी दिल्ल

Dr. Mohan Bhagwat: धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी, जगातील आव्हानांवर भारताच्या ज्ञानपरंपरेत मार्ग

मुंबई: “राष्ट्राचा उद्देश धर्म आहे आणि धर्मच राष्ट्राला टिकवून ठेवतो. धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून

Surat- Udaipur Vande Bharat Express: पश्चिम रेल्वेवर सुरू होतेय नवीन वंदे भारत ट्रेन, 7 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण होईल प्रवास; पाहा, वेळ, थांबे, तिकीट दर!

मुंबई: पश्चिम रेल्वेला आता आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. उद्यापासून अर्थात 3 ऑक्टोबरपासून सुरत ते

Flydubai Plane Attack : फ्लायदुबई विमान हल्ला : "ती बातमी ऐकून मी हादरून गेले होते..." - कॅप्टन स्मित मच्छार यांच्या पत्नीची भावूक प्रतिक्रिया

नवी दिल्ली : फ्लायदुबईच्या विमानात कॉकपिटमध्येच झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून वाचलेले भारतीय वैमानिक कॅप्टन

Modi Putin : युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मोदींचे प्रयत्न; पुतिन म्हणाले, “मोदींच्या कल्पना प्रभावी!”

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी