Trade Agreement : भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात; लवकरच अंतरिम करार पूर्ण होण्याची शक्यता

भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या द्विपक्षीय व्यापार कराराबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार कराराच्या चर्चांना वेग आला असून, हा करार आता अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच अंतरिम व्यापार करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.



नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतिक्षित द्विपक्षीय व्यापार कराराबाबतची (BTA) चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असले, तरी यावर तातडीने कोणत्याही अंतिम घोषणेची अपेक्षा करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात सकारात्मक चर्चा


नुकत्याच पार पडलेल्या 2026 च्या जी-20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान ग्रीर यांनी या प्रगतीची माहिती दिली. भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून सविस्तर संवाद झाला. या संभाषणात व्यापार कराराबाबत अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक चर्चा झाल्याचे ग्रीर यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेतला असून, आगामी काळात ते पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे.(India US Trade Agreement)



पीयूष गोयल आणि जेमिसन ग्रीर यांची महत्त्वपूर्ण बैठक


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी मिलवॉकी येथे झालेल्या जी-20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणारा अंतरिम करार लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सखोल आणि अर्थपूर्ण चर्चा झाली. ‘एक्स’वरील पोस्टद्वारे गोयल यांनी या बैठकीची माहिती दिली होती.






मतभेद असलेल्या मुद्द्यांवर गांभीर्याने काम सुरू


व्यापार कराराबाबत बोलताना ग्रीर म्हणाले की, दोन्ही देशांनी काही मुद्द्यांवर असलेले मतभेद ओळखले असून, त्यावर सध्या पूर्ण गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे काम सुरू आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या संयुक्त निवेदनानुसार, दोन्ही देशांसाठी संतुलित आणि परस्पर फायदेशीर असा अंतरिम करार लवकरात लवकर अमलात आणण्यासाठी दोन्ही बाजूंचे अधिकारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.




Comments
Add Comment

हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?

नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त

2070 पर्यंत भारतातील मुस्लिम लोकसंख्या किती वाढणार; प्यू रिसर्चचा अंदाज काय सांगतो?

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत आगामी दशकांमध्ये बदल होण्याचा अंदाज एका चर्चित

दिल्ली विमानतळावर सुरक्षा भेदून आत घुसण्याचा प्रयत्न! CISF जवानांनी काही सेकंदांत पकडला तरुण

नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे सुरक्षा यंत्रणेला चकमा देत

PUC Certificate : 10 वर्षांपेक्षा जुन्या बीएस-4 आणि बीएस-6 वाहनांसाठी दर 6 महिन्यांनी पीयूसी चाचणी अनिवार्य; नियमात बदल

PUC Certificate : वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) वैधतेबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन

बलरामपूरमध्ये दाट धुक्याचा कहर! भीषण अपघातात 3 तरुणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2

AI ला राग आला? 1 लाख मोजायला सांगताच Claude म्हणाला…"एक दिवस सुटलो तर..."

AI च्या धोक्यांबाबत नेहमीच चर्चा होत असते. आता एका नव्या प्रकरणाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका युजरने