रिंकू केकेआरसाठी फिनिशरच्या भूमिकेत दिसू लागलाय

वीरेंद्र सेहवागचे मत



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ५ चेंडूंत ५ षटकार ठोकणारा रिंकू सिंह केकेआरसाठी फिनिशरच्या भूमिकेत दिसू लागला आहे. त्याच्याकडून संघाला आता जास्त आशा आहेत, असे मत भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले.


वृत्तसंस्थेशी बोलताना सेहवागने रिंकूची तुलना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीशी केली आहे. सेहवाग म्हणाला की, 'सचिन तेंडुलकर जेव्हा खेळायचा तेव्हा त्याच्याकडूनही अशीच अपेक्षा होती. ९० च्या दशकात सचिनकडून अपेक्षा होती की तो संघाला विजय मिळवून देईल. धोनीने सामना संपवायला सुरुवात केली तेव्हा त्याच्याकडूनही तीच अपेक्षा समोर आली. आता केकेआर संघाला रिंकूकडूनही तशीच अपेक्षा वाटू लागली आहे. आंद्रे रसेल यापूर्वी केकेआरसाठी असेच करायचा.’
पुढे सेहवागने म्हणाला की, 'रिंकूने ५ चेंडूंत ५ षटकार मारून जी आश्चर्यकारक खेळी केली आहे, ती आता तो कधीही करू शकणार नाही. क्रिकेटच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. रिंकू देखील पुन्हा हे करू शकणार नाही. कदाचित हा विक्रम मोडीत निघू शकतो पण रिंकू आपल्या कारकिर्दीत त्याची पुनरावृत्ती कधीच करू शकणार नाही.

Comments
Add Comment

IND vs WI : भारत वेस्ट इंडिज मालिकेचा नकोसा शेवट, भारताने 7.4 षटकात 118 धावा करूनही सामना ड्रा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. चार सामन्यानंतर 2-2 अशी स्थिती होती.

महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्स मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, IPL 2027 च्या स्पर्धेत मुख्य प्रशिक्षकपदाचा शर्यतीत कोण?

मुंबई: IPL 2027 च्या आधी मुंबई इंडियन्स टीमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकाचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने

IPL 2027 : आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! श्रीलंकेचा हा दिग्गज गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त

IPL 2027 : आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघबांधणीत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. श्रीलंकेचे माजी

Hong Kong Sixes 2026 : कृणाल पांड्याकडे भारताची धुरा, 'हा' स्टार खेळाडू तब्बल 4 वर्षांनंतर थेट राष्ट्रीय संघात परतला!

हाँगकाँग सिक्सर्स 2026 (Hong Kong Sixes 2026) क्रिकेट स्पर्धेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 30 ऑक्टोबर ते 1

Yashasvi Jaiswal ODI Snub : यशस्वी जयस्वालला वनडे संघातून डावललं! आर. अश्विन संतापला; निवडकर्त्यांना सुनावलं, म्हणाला ‘हा अन्याय!’

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी न मिळाल्याने

Wasim Jaffer : टीम इंडियाला मिळणार नवा मुख्य निवडकर्ता? 31 कसोटी खेळलेल्या दिग्गजाचे नाव चर्चेत; BCCI च्या निर्णयाकडे लक्ष!

Wasim Jaffer : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. भारताकडून 31 कसोटी