म्हाडा सोडतीसाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या प्रस्तावित सदनिका विक्री सोडतीच्या पार्श्वभूमीवर मंडळाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. इच्छुक अर्जदारांनी सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच अर्ज नोंदणीकरण करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले. अर्ज नोंदणीसाठी कोणत्याही समाजमाध्यमांची, त्रयस्थांची, संस्थांची अथवा इतर मध्यस्थांची मदत 'म्हाडा'तर्फे घेण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.



मुंबई मंडळाच्या आगामी सदनिका विक्री सोडतीच्या अनुषंगाने अनेक समाजमाध्यमे, अनधिकृत संकेतस्थळे, मुंबई मंडळाच्या येऊ घातलेल्या सोडतीबाबत 'म्हाडा'चे बोधचिन्ह अनधिकृतरित्या वापरून म्हाडाच्या प्रकल्पांची, त्यांच्या आकारमानाची, किमतींची अवास्तव माहिती प्रसिद्ध करीत असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. ही समाजमाध्यमे नागरिकांना विशिष्ट लिंक पाठवून क्लिक करण्याबाबत सूचित करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्याकरिता मंडळातर्फे आवाहन केले आहे की, म्हाडातर्फे कोणतेही व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही संकेतस्थळाला माहिती देण्यात आलेली नाही. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुप्स अथवा संकेत स्थळावर जोडण्याकरिता प्राप्त झालेल्या लिंकवर सहभाग घेऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, या माध्यमातून नागरिकांची फसवणूक झाल्यास अथवा इतर कोणत्याही व्यवहारास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.



सदनिका विक्रीकरिता मंडळाकडे निश्चित प्रणाली कार्यरत आहे. सदनिका विक्री सोडतप्रक्रियेत सहभागी होण्याकरिता https://www.mhada.gov.in तसेच https://housing.mhada.gov.in याच म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळांचा वापर करावा, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने