‘अगं अगं सूनबाई, काय...’ घेणार निरोप



  • ऐकलंत का!: दीपक परब



अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ ही मालिका गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. वेगळा विषय, वेगळ्या धाटणीची असूनही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडली. त्यामुळे निर्मात्यांनी आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकेचा येत्या काही दिवसांत शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. या मालिकेची स्टारकास्ट उत्तम आहे.


मालिकेचा विषय वेगळ्या धाटणीचा आहे. प्राईम टाईममध्ये ही मालिका प्रसारित केली जात आहे. पण तरीही टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका मागे पडली आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी रिपोर्टनुसार, टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका ३५व्या क्रमांकावर आहे. या मालिकेला ०.९ रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत घराघरात घडणारी सासू-सुनांची भांडणं विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली होती. आजच्या आधुनिक काळात, सासू-सुनेमधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं याचा धमाल प्रवास प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळाला. या मालिकेत सुकन्या कुलकर्णी आणि स्वानंदी टिकेकर मुख्य भूमिकेत होते. या मालिकेची जागा ‘खुप्ते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम घेणार आहे. १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गुपिते उलगडली जाणार आहेत.

Comments
Add Comment

Pahla pyaar doosri baar Posters : सहा नव्या जोड्या, प्रेमाची नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’च्या हटके पोस्टर्सनी वाढवली उत्सुकता

लव्ह फिल्म्सने सहा नव्या चेहऱ्यांच्या जोड्यांचे आकर्षक पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत. या पोस्टर्समधून

Rashmika & Vijay : रश्मिका आणि विजयचा शाही अंदाज! 'रणबाली'च्या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये केले खास ट्विनिंग

सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी त्यांच्या आगामी 'रणबाली' या

The Raja Saab : ‘द राजा साब’च्या अपयशामागे संक्रांतीची रिलीज ठरली कारणीभूत? निर्मात्यांनी सांगितली चूक

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘द राजा साब’ प्रदर्शनापूर्वी चांगलाच चर्चेत होता. मात्र,

King khan: किंग खानचा चाहत्यांसाठी गुड न्यूज, शारुखच्या वाढदिवशी फॅन्सला मिळणार खास गिफ्ट

मुंबई: शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाच्या

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूडमध्ये झळकणार!

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आता बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आदिनाथ कोठारे

Arijit Singh Mumbai Concert : अरिजीत सिंगच्या मुंबई कॉन्सर्टची महागडी तिकीटं चर्चेत; किंमत ऐकून बसेल धक्का!

मुंबई : आपल्या जादूई आणि सुरांनी कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय गायक अरिजीत सिंग (अरिजित सिंह)