गुजरातच्या किनारपट्टीवर जप्त केला तब्बल १२ हजार कोटींचा ड्रग्ज साठा

अहमदाबाद : गुजरातच्या किनारपट्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत इराणहून गुजरातला आणला जाणारा २६०० किलो ड्रग्जचा साठा पकडला आहे. भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याची गुप्त सूचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या ड्रग्जची किंमत तब्बल १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.


इराणहून गुजरातला आणले जाणारे हे अमली पदार्थ तिथे पोहोचण्यापूर्वीच नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेमुळे ताब्यात घेण्यात यश आले आहे. नौदलाच्या आयएनएस टीईजी F-14 या जहाजाने अरबी समुद्र परिसरात ही अमली पदार्थाची खेप पकडली आहे. सुदानमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी आयएनएस टीईजी तैनात करण्यात आली होती. तिथून परतताच ही मोठी कारवाई झाली आहे.


तस्करी करणा-या जहाजावर असलेल्या माफियाला कोची बंदरावर नेऊन त्याची चौकशी नौदल आणि एनसीबी करत आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांविषयी तसंच ड्रग्जच्या तस्करीविषयी सविस्तर चौकशी केली जाणार आहे. सागरी मार्गाने भारतात आणली जाणारी ड्रग्जची आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप आहे.


याआधीही फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटने २००० कोटींच्या ड्रग्जची खेप पकडली होती. गुजरातच्या लगतच्या सागरी भागात अनेकवेळा कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.


Comments
Add Comment

दिल्ली मेट्रो स्थानकात खळबळ : १५५ ग्रॅम सोन्याची पावडर लपवून पळणाऱ्या प्रवाशाला CISFने घेतले ताब्यात

नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मशिद मेट्रो स्थानकावर (Delhi Metro Station) १७ ऑक्टोबर रोजी एक थरारक घटना घडली. सामानाची तपासणी

Airtel Recharge: एअरटेलचे डेटा नसलेले तीन नवे ‘व्हॉइस आणि एसएमएस’ प्लॅन सादर; जिओशी असणार स्पर्धा

मुंबई: मोबाईलवर इंटरनेटचा वापर न करता केवळ कॉलिंग आणि मेसेजसाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने तीन नवे

CISF Jawan : जामा मशीद मेट्रो स्टेशनवर संशयित ताब्यात; सीआयएसएफच्या जवानांचा फिल्मी स्टाईल पाठलाग

दिल्लीतील ऐतिहासिक आणि अत्यंत वर्दळीच्या जामा मशीद मेट्रो स्टेशनवर सुरक्षेला बगल देऊन पळून जाणाऱ्या एका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंजाब दौऱ्यावर! ‘नशारूपी रावण’ दहनातून ड्रग्सविरोधात संदेश

लुधियाना : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मंगळवारी होणाऱ्या लुधियाना दौऱ्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठी

भारत आणि पोलांडमध्ये मैत्रीचं नव पर्व ! पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान भारत दौऱ्यावर

भारत आणि पोलंड यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

Weather Alert: 13 राज्यांना पावसाचा इशारा! 80 किमी वेगाने वारे वाहणार? IMD चा अलर्ट

नवी दिल्ली : मान्सूनचा परतीचा प्रवास अंतिम टप्प्यात असतानाच देशातील हवामानात मोठी उलथापालथ झाली आहे. भारतीय