यंदाही बारावीच्या निकालात मुलींची बाजी; कोकण नंबर वन

राज्याचा निकाल ९१.२५ टक्के


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे.



कोकण विभाग अव्वल तर मुंबईचा निकाल सर्वात कमी


बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला असून मुंबईचा निकाला ८८.१३ टक्के लागला आहे.


यावर्षी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०९ टक्के, कला शाखेचा निकाल ८४.०५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९०.४२ टक्के लागला आहे.



बारावीच्या १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल १०० टक्के


यंदाची बारावीची परीक्षा १५४ विषयांसाठी घेण्यात आली. त्यात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक शिक्षण हे विषय होतं. विज्ञानासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चार माध्यमातून तर अन्य शाखांसाठी या चार भाषांसह गुजराती व कन्नड अशा सहा भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. बारावी परीक्षेच्या १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.



विभागनिहाय निकाल



  • कोकण : ९६.०१ टक्के

  • पुणे : ९३.३४ टक्के

  • कोल्हापूर : ९३.२८ टक्के

  • अमरावती : ९२.७५ टक्के

  • औरंगाबाद : ९१.८५ टक्के

  • नाशिक : ९१.६६ टक्के

  • लातूर : ९०.३७ टक्के

  • नागपूर : ९०.३५ टक्के

  • मुंबई : ८८.१३ टक्के

Comments
Add Comment

Rain Update : विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस ! हवामान खात्याचा 'या' जिल्ह्यांना इशारा

Rain Update : राज्यभरात आज गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळत असताना पावसानं पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.

डेटा-लिकप्रकरणी सीईटी केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट

मुंबई: एमएच-सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात

Baramati Crime : बारामतीत ३० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे गावात ३० वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

ST Bus News: 'एसटी'कडून ५ हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकवाहिनीला मिळणार नवी ताकद

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होण्याचा मार्ग

Central Railway : तिकीट मिळालं नाही म्हणून चिंता नको! कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या ४ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याची घोषणा

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी