Baramati Crime : बारामतीत ३० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे गावात ३० वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. खडकआळी, पणदरे) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी (१२ सप्टेंबर २०२६) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी पावणे आठच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून बेडरूममध्ये वैशाली पवार यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. (Baramati Crime)



या प्रकरणी मृत महिलेची सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, आरोपीची ओळख पटवून त्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Baramati Crime)
Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात

ST Bus News: 'एसटी'कडून ५ हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकवाहिनीला मिळणार नवी ताकद

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होण्याचा मार्ग

Central Railway : तिकीट मिळालं नाही म्हणून चिंता नको! कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या ४ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याची घोषणा

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी

महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान राज्य संरक्षित स्मारक, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई: श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थानाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील खेड

Dahisar Bhayandar Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर-भाईंदर सागरी मार्गाचं काम वेगात; ४५ मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत

मुंबई : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी आणि उत्तर मुंबईतील प्रवास अधिक वेगवान करण्याच्या

Rajapur Accident : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या वाहनाचा राजापूरमध्ये भीषण अपघात; 10 जण जखमी

रत्नागिरी : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईहून कोकणातील गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाला रविवारी