Soveli Dam : सरकार धरण फुटण्याचीच वाट पहातेय!

पाच वर्षांपासून पाठपूरावा करुनही होतेय दुर्लक्ष


दापोलीतील सोवेली धरणाला गळती, नागरिकांमध्ये घबराट, प्रशासनाकडून पाहणी, दक्ष राहण्याच्या सूचना

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दापोली तालुक्यात दाभोळ भंडारवाडा येथील हनुमान मंदिराची भिंत कोसळून मंदिराला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे दापोलीतील सोवेली धरणाला गेल्या पाच वर्षापासून लागलेली गळती यावर्षी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. प्रशासनाच्या वतीने स्थानिक अधिका-यांनी धरणाची पाहणी केली. या पावसात सर्वजण हतबल असून नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.


गळती लागल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सोवेली धरणाची पाहणी केली. या पाहणीत धरणाच्या भिंतीच्या मध्यभागी आणि पायाजवळ पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील ग्रामस्थांनी मागिल ५ वर्षांपासून गळती होत असून त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही, मात्र पावसाळ्यात येथे धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाब दापोली प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे.


दरम्यान, या पाहणीनंतर प्रांताधिकारी डॉक्टर थोरबोले यांनी संबंधित विभागाला तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. धरणाच्या खालील बाजूला असणा-या लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हे धरण ज्यांच्या अधिपत्याखाली येते त्या लघुपाटबंधारे विभागाला प्रांताधिकार्‍यांनी लेखी पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी कळवले आहे.


मात्र पावसाचा जोर कायम असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागिल पाच वर्षापासून पाठपूरावा करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने सरकार धरण फुटण्याचीच वाट पहातेय का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Lalbaugcha Raja Crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांग; भाविकांना धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल!

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेक भावि

Nashik : नागरी प्रश्नांचा आढावा, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासह श्री गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पूर्वतयारीचा

Nashik News : गंगापूर रोडवर मध्यरात्री झाडांची अनधिकृत छाटणी, ‘छोटा हत्ती’ वाहन सीसीटीव्हीत कैद

Nashik Tree Cutting News : नाशिकच्या गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान मध्यरात्री झाडांची अनधिकृतपणे छाटणी

Nashik Accident News : सर्व्हिसरोडवर भीषण अपघात ! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गोविंदनगरजवळील डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूचं डोहाळे जेवण थाटामाटात पार पडलं; पती राज निदिमोरूच्या 'त्या' कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले

Samantha Ruth Prabhu Baby Shower : सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच आई होणार आहे. ती आणि तिचे पती

Bigg Boss Telugu 10: हिंदी सोडा, बिग बॉस तेलुगुमध्ये 'या' स्पर्धकाचीच चर्चा; एका एपिसोडसाठी घेतोय लाखोंचं मानधन

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये एकच शो सुरू झाला आहे.