Samantha Ruth Prabhu Baby Shower : सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच आई होणार आहे. ती आणि तिचे पती सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरू (Raj Nidimoru) त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी मोठे उत्सुक झाले आहेत. नुकताच समंथाच्या डोहाळे जेवणाचा समारंभ पार पडला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ तिनं सोशल मीडियावरही शेअर केलेत, ज्यामध्ये ती पती राज निदिमोरू यांच्यासोबत हा सोहळा साजरा करताना दिसत आहे. समंथाचा डोहाळे जेवणाचा समारंभ पारंपरिक पद्धतीनं पार पडला.
सामंथा रूथ प्रभू हिनं तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर आपल्या पारंपरिक समारंभाचे आनंदाचे क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेत. या कार्यक्रमात 'कला आवरण' (श्री कल्पम), 'अभिषेक' आणि इतर पारंपरिक विधींचा समावेश होता. काही फोटोंमध्ये सामंथानं मस्टर्ड कलर अनारकली सूट परिधान केला होता. एका व्हिडीओमध्ये, मंत्रोच्चारांच्या गजरात अभिनेत्रीवर पवित्र जल शिंपडलं जात असल्याचं दिसून येतंय. त्यानंतर, सामंथानं पिवळ्या रंगाची रेशमी साडी परिधान केली. (Samantha Ruth Prabhu Baby Shower)
'त्यानं मला सर्वाधिक प्रभावित केलंय'
आपल्या डोहाळे जेवणातील विधींबाबत समंथानं लिहिलंय की, "या विधींमध्ये मातेकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, त्यानं मला सर्वाधिक प्रभावित केलंय. तिला दैवी तत्त्वाचं मूर्त रूप मानून सन्मानित केलं जातं, एक अशी पवित्र निर्माती, जिच्या माध्यमातून एका नव्या जीवाला आकार मिळतो. तिच्या उदरात वाढणाऱ्या बाळासाठी, तसेच स्वतः एका नव्या रूपात पुनर्जन्म घेणाऱ्या त्या स्त्रीसाठीही हा एक आशीर्वादच आहे..."
राज निदिमोरू यांनी पत्नी समंथाची काढली 'दृष्ट'
समंथा रुथ प्रभूचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीनं झाला असला, तरीसुद्धा मोठ्या उत्साहात पार पडला. डोहाळे जेवणाच्या खास सोहळ्यात सर्वांनी होणाऱ्या आईला आशीर्वाद दिले. पण, या कार्यक्रमात होणाऱ्या बाबांनी केलेल्या एका खास कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. एका फोटोमध्ये राज निदिमोरू यांनी समंथाला प्रेमानं न्याहाळताना दिसले. तसेच, त्यांनी आपल्या लाडक्या बायकोची दृष्टसुद्धा काढली. (Samantha Ruth Prabhu Baby Shower)
सांगायचं झालं तर समंथाचं हे दुसरं लग्न आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी सिनेनिर्माते राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्याशी तिने दुसरी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सहाच महिन्यात समंथा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अखेर समंथानं आपण आई होणार असल्याचं सर्वांना सांगून टाकलं होत.