नकारात्मक राजकारणात विरोधक मश्गुल

मोदींचा विरोधकांवर प्रहार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘देशातील विरोधक हे नकारात्मक राजकारण करण्यात मश्गुल आहेत’, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले, ‘आमचे सरकार हे सकारात्मक राजकारणावर लक्ष केंद्रित करत आहे. यांच्या (विरोधकांच्या) असल्या क्षुल्लक राजकारणापेक्षा आम्ही विकासाला प्राधान्य देतो’. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रविवारी देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केल्यानंतर एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी आरोप केला की, विरोधी पक्ष हे काम करणार नाही आणि इतरांना काम करू देणार नाही, या तत्त्वावर भर देत आहेत’.
रेल्वे मंत्रालयाने देशातील १ हजार ३०० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत भारत’ या योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्याने देशातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठविली. मोदी म्हणाले, गेल्या ७० वर्षात यांनी एकही युद्धस्मारक बांधलेले नाही. आमच्या सरकारने जेव्हा ते बांधले तेव्हा मात्र त्यांनी विरोध केला. विरोधी पक्ष प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत असतात. संसद भवनाच्या नवीन इमारतीलाही त्यांनी विरोधी केला होता. हे लोक कधी स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे फिरकले नाहीत. सरदार पटेल यांच्यापुढे ते कधी नतमस्तक झाले नाहीत. हे लोक स्वतः काही करणार नाहीत आणि दुसऱ्याला करू देणार नाहीत. ना काम करणार ना, करू देणार, ही त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची वृत्ती आहे आणि ते आजही त्याच वृत्तीला चिकटून बसले आहेत. त्यांनी कधी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे जाऊन आदरांजली वाहिलेली नाही. संसदेची आधुनिक इमारत बांधण्यात आली आहे, पण विरोधकांमधील काही महाभागांनी त्याला विरोधही केला. देशाचा विकास हा देशातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत आहोत, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी त्यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ घोषणेचाही उल्लेख केला. भारतीय रेल्वेचे कौतुक करत मोदी म्हणाले, आपल्या रेल्वेने अलिकडच्या काही वर्षांमध्ये १५ लाखांहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.



यांनी एकही युद्धस्मारक बांधले नाही...


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आम्ही कर्तव्य मार्गाचा विकास केला, परंतु यांनी त्यालाही विरोध केला. यांनी ७० वर्षात देशातील वीरांसाठी किंवा शहिदांसाठी एकही युद्धस्मारक बांधलेले नाही. परंतु, आम्ही युद्धस्मारक बांधले तेव्हा यांनी त्यावर टीका केली. युद्धस्मारकावर टीका करताना यांना लाज कशी नाही वाटली?’



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Semicon India 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत 'सेमिकॉन इंडिया 2026' चे भव्य उद्घाटन; सेमीकंडक्टर अभियानाच्या १३.५ अब्ज डॉलरच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'सेमिकॉन इंडिया 2026' परिषदेचे दिमाखदार उद्घाटन

Indian youth death abroad : अमेरिकेत हैदराबादच्या २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांची केंद्र सरकारकडे आर्त हाक

चेन्नई: अमेरिकेतून एक अत्यंत दुःखद

Yudh Abhyas 2026: डोंगरात युद्धाचा सराव! भारत-अमेरिकेचे जवान, ड्रोन आणि रोबोटिक डॉग मैदानात

औली (उत्तराखंड) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘युद्ध अभ्यास २०२६’ सध्या चर्चेत आला आहे.

Climate change Maharashtra : महाराष्ट्रातील ५८% नागरिक हवामान बदलामुळे चिंतित; पण अवघ्या ३% लोकांसाठी हा निवडणुकीचा मुद्दा ?

मुंबई : महाराष्ट्रातील तब्बल ५८ टक्के नागरिक हवामान बदलाच्या (Climate Change) वाढत्या धोक्यामुळे अत्यंत चिंतेत आहेत.

Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड; उड्डाण रद्द

अहमदाबाद: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या

PM Narendra Modi birthday : 'आधुनिक भारताचे शिल्पकार!' पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवशी देशभरात 'सेवा संकल्प'; पुतिन, अमित शाह अन् सचिनकडून शुभेच्छांचा वर्षाव

PM Narendra Modi birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून आणि देशभरातून त्यांच्यावर