Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड; उड्डाण रद्द

अहमदाबाद: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. वडनगरहून अहमदाबादला जाण्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक अडचण आढळून आली. त्यामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द करण्यात आले आणि शिंदे रस्तेमार्गे अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले. (Eknath Shinde)


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी वडनगरमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियाना'च्या कार्यक्रमात शिंदे सहभागी झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. वडनगरहून वाराणसीच्या दिशेने जाणाऱ्या बाइक रॅलीला देखील यावेळी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. (Seva Sankalp Abhiyana)



पुढील कार्यक्रमासाठी अहमदाबालाला जाणार होते


वडनगरमधील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर शिंदे पुढील कार्यक्रमासाठी अहमदाबादला जाणार होते. त्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, उड्डाण करण्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टरने प्रवास न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शिंदे कारने अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले. ( Helicopter Technical Fault)



तांत्रिक बिघाड लक्षात येताच उड्डाण रद्द


या घटनेमुळे काही काळ हेलिकॉप्टर प्रवासाबाबत चर्चा झाली. मात्र, तांत्रिक बिघाड लक्षात येताच उड्डाण थांबवण्यात आल्याने शिंदे यांचा पुढील प्रवास रस्तेमार्गे करण्यात आला. अहमदाबादमधील नियोजित कार्यक्रमासाठी ते कारने रवाना झाल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi birthday : 'आधुनिक भारताचे शिल्पकार!' पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवशी देशभरात 'सेवा संकल्प'; पुतिन, अमित शाह अन् सचिनकडून शुभेच्छांचा वर्षाव

PM Narendra Modi birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून आणि देशभरातून त्यांच्यावर

Prime Minister Narendra Modi : 'ब्रिक्स'चा नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर; भारताची जागतिक पत सिद्ध झाल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या 'ब्रिक्स' (BRICS) परिषदेचा यशस्वी समारोप झाला असून सर्वांच्या सहमतीने 'नवी

PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेसचं रहस्य काय ? डाएटबाबत पंतप्रधानांनीच सांगितल्या खास गोष्टी

PM Narendra Modi Diet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 76वा वाढदिवस आहे. वय वाढत असताना फिटनेस आणि ऊर्जा टिकवून ठेवणं

Terrorist Encounter : उधमपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; चकमकीत 2 दहशतवादी ठार, शोधमोहीम सुरू

उधमपूर : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवादाविरोधात कारवाई सुरूच आहे. उधमपूर जिल्ह्यातील एका

Lucknow Crime News : तरुणीला कारची धडक, बोनेटवर लटकवत नेलं अन्..., व्हिडीओ व्हायरल

Lucknow Crime News : देशभरात हिट अँड रनच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असतानाच आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून

India Russia relations : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ रशियाच्या दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ होणार

नवी दिल्ली: भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य अधिक बळकट करण्याच्या