Hello UPI : आता इंटरनेटशिवाय केवळ फोन कॉल करुन पाठवता येणार पैसे

काय आहे एनपीसीआयचे नवे फीचर?


मुंबई : डिजीटल होण्याकडे भारत यशस्वी पावले उचलत आहेत. भारतात जितक्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट केले जाते तितके अजून कोणत्याही देशात केले जात नाही. डिजिटल माध्यमातून देशातील यूपीआय (UPI) पेमेंट सुविधा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. जगभरातील कित्येक देशांमध्ये देखील आता यूपीआय पेमेंट करता येत आहे. ही सुविधा आणखी यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता एनपीसीआयने (NPCI) एक नवीन फीचर लाँच केलं आहे.


एनपीसीआयच्या या नवीन फीचरमध्ये इंटरनेटचीही गरज भासणार नाही. यात केवळ फोन कॉलच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. या फीचरचे नाव आहे 'हॅलो यूपीआय'. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये याबाबत घोषणा केली. यासोबतच, यूपीआयबाबत आणखी नवे फीचर्स देखील यावेळी लाँच करण्यात आले.



कसं असणार हॅलो यूपीआय?


'हॅलो यूपीआय' या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी यूजर्स आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ग्राहक एका ठराविक नंबरवर कॉल करू शकतात. यासाठी विविध बँकांसाठी वेगवेगळे नंबर देण्यात आले आहेत. या नंबरवर कॉल करुन, आपल्या बँकेचं नाव सांगावं लागणार आहे. सोबतच, ट्रान्झॅक्शनचा प्रकार सांगून, शेवटी यूपीआय PIN च्या मदतीने तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. ही सुविधा सध्या केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे तसेच यातून केवळ १०० रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत. लवकरच यात अन्य भाषादेखील येतील, असं एनपीसीआयने स्पष्ट केलं.



आणखी फीचर्स लाँच


यासोबतच यूपीआयवर क्रेडिट लाईन हे फीचरही लाँच करण्यात आलं आहे. या माध्यमातून यूजर्सना बँकांकडून प्री-अप्रूव्ह्ड लोन मिळू शकतं. सोबतच, आधीपासून घेतलेल्या कर्जाच्या सहाय्याने यूपीआय प्लॅटफॉर्मवर ट्रान्झॅक्शन करता येईल. यासोबतच 'लाईट एक्स' नावाचं आणखी एक प्रॉडक्ट NPCI ने लाँच केलं आहे. इंटरनेट शिवाय व्यवहार करण्यासाठी याचा वापर करता येईल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.