Bhairavi Vaidya : ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya) यांचे निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली आहे. त्यांनी सुमारे ४५ वर्ष मनोरंजनसृष्टीमध्ये काम केले आहे.


भैरवी यांनी अनेक चित्रपटांसह टीव्ही मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारलेल्या आहेत. हिंदीसह त्यांनी गुजराती चित्रपटामध्ये देखील काम केले. ऐश्वर्या राय बच्चनच्या ताल या चित्रपटामधील जानकी ही भूमिका साकारून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तसेच चोरी चोरी चुपके चुपके या सलमान खानच्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले होते. नीमा डेन्जोंगपा या मालिकेतील त्यांच्या पुष्पा या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.





त्याचबरोबर व्हॉट्स योर राशी, हमराज, क्या दिल ने कहा, व्हेंटिलेटरमध्ये त्या प्रतिक गांधीसोबत दिसल्या होत्या. या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.


त्यांच्या जाण्याने चित्रपट आणि टीव्ही विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.





'व्हेंटिलेटर' या चित्रपटात भैरवी यांच्यासोबत प्रतीक गांधीनं काम केलं. भैरवी यांच्या निधनानंतर प्रतीकनं भैरवी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यानं सांगितलं, व्हेंटिलेटर चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. आमच्यात खूप छान बॉन्डिंग होते. मी त्यांना माझ्या लहानपणापासून टीव्हीवर पाहत आलो आहे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी समिती, शेतकऱ्यांना विकसित भूखंड

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी 22 सप्टेंबर 2026 रोजी झाली. या बैठकीत दुष्काळ निवारणासह मुंबईतील

Devendra Fadnavis : दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ समिती

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना काढणार मुंबई : राज्यावर

Maharashtra Noise Pollution : धार्मिक मिरवणुकांतील आवाजावर हायकोर्टाची नजर, कायद्याच्या अंमलबजावणीचा मागवला अहवाल

Maharashtra Noise Pollution : धार्मिक मिरवणुका आणि उत्सवांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित काही नेते, त्यांचे नातेवाईक आणि व्यावसायिक सहकाऱ्यांच्या आर्थिक

  Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; 22 सप्टेंबरला अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा, कुठे बरसणार जोरदार सरी?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत. मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली

Ketan Aggarwal Murder : प्लीज! त्याची हत्या करू नका..' केतनच्या हत्येआधी नक्की काय घडलं? 2 साक्षीदाराने सगळंचं सांगितलं

पुणे :  पुण्यातील लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी काही महत्त्वाची