Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित काही नेते, त्यांचे नातेवाईक आणि व्यावसायिक सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आयकर विवरणपत्रे, मालमत्ता, मोठे आर्थिक व्यवहार तसेच व्यावसायिक संबंधांची तपासणी केली जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित कंपन्यांना मिळालेल्या सरकारी कंत्राटांचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.


प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांबरोबरच निधीच्या स्रोताची, जमीन आणि मालमत्तेचीही छाननी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कंपनीला सुमारे ७६४.७ कोटी रुपयांची सरकारी कामे मिळाल्याच्या आरोपांचीही तपासणी केली जाणार आहे. कंत्राटातील बोली प्रक्रिया आणि संबंधित व्यवहारांमध्ये झालेली वाढ यांचीही तपासणी होणार आहे.



या व्यवहारांकडे मनोज जरांगे पाटील यांचे माजी सहकारी अजय बारस्कर यांनी केलेल्या आरोपांनंतर लक्ष वेधले गेले होते. बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर आंदोलनाच्या माध्यमातून कंत्राटे मिळवून दिल्याचे आरोप केले होते. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जरांगे यांच्या भेटीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.


दरम्यान, सरकारी कंत्राटांमध्ये राजकीय फायदा किंवा ‘क्विड प्रो क्वो’ झाल्याचा पुरावा नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आयकर विभागाकडून होणाऱ्या चौकशीत संबंधित आर्थिक व्यवहार आणि कंत्राटांबाबत नेमकी कोणती तथ्ये समोर येतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Noise Pollution : धार्मिक मिरवणुकांतील आवाजावर हायकोर्टाची नजर, कायद्याच्या अंमलबजावणीचा मागवला अहवाल

Maharashtra Noise Pollution : धार्मिक मिरवणुका आणि उत्सवांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च

  Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; 22 सप्टेंबरला अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा, कुठे बरसणार जोरदार सरी?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत. मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली

Ketan Aggarwal Murder : प्लीज! त्याची हत्या करू नका..' केतनच्या हत्येआधी नक्की काय घडलं? 2 साक्षीदाराने सगळंचं सांगितलं

पुणे :  पुण्यातील लोहगड परिसरात झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी काही महत्त्वाची

Chandrashekhar Bawankule News: महसुलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे केंद्रीय सचिवांकडून कौतुक

मुंबई: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या

Sindhudurg News: सिंधुदुर्गात ऑनलाइन गेमिंग, मटक्याविरोधात विशेष यंत्रणा, मंत्री नितेश राणे यांची माहिती

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑनलाइन गेमिंग, ऑनलाइन मटका आणि जुगाराच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी

Miraj Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालय परिसर हादरला; प्रवेशकमानीचा स्लॅब कोसळून ७ मजूर गंभीर जखमी

सोमवारी मिरज येथील शासकीय रुग्णालय परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर