Ban on Pakistani artists : पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली!

मुंबई : २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि संगीतकारांसह पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्यास बंदी घालण्यात (Ban on Pakistani artists) आली होती. परंतु नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी उठवण्यात आली आहे.


काही दिवसांपुर्वी एका सिनेकर्मीने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आपल्या याचिकेत त्याने भारतीय सेलिब्रिटींना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयात माहिरा खान, फवाद खान यांसारख्या कलाकारांना भारतीय चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावताना म्हटले आहे की, ''देशभक्ती ही देशावर असलेल्या भक्तीमध्ये आहे, त्याचा अर्थ दुसऱ्याशी शत्रुत्व करणे असा होत नाही.'' न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पी. पूनीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.


मुंबई उच्च न्यायालयाने असेही नमूद केले की, या याचिकेत योग्यता नाही आणि भारत सरकारने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे हा निर्णय एक दिलासा आहे. यामुळे सांस्कृतिक सलोखा, एकता आणि शांततेत वाढ होईल.


या निर्णयामुळे फवाद खान, अली जफर, माहिरा खान, सबा कमर अशा लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय सिनेमांमध्ये अभिनय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Thane Water Cut: पुण्यानंतर आता ठाण्यातही पाणीकपात, 24 तास राहणार पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका?

ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. MIDC मार्फत महापालिका क्षेत्रात होणार्‍या परिसरात पाणी पुरवठा बंद

JVPD उड्डाणपुलाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांकडून पाहणी, पूल केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार?

मुंबई: मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच गडद होत चालला आहे. केव्हाही शहरामध्ये प्रवास करा,

ठाणे जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार, स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे अण्णा बनसोडे यांचे निर्देश...

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जमिनीवर

'फ्लेक्समुक्त मुंबई' अभियानासाठी महापौरांची धडाकेबाज सुरुवात, घाटकोपरमध्येच अनधिकृत बॅनर हटवत केला मोहिमेचा श्रीगणेशा

मुंबई: मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनरचे प्रमाण वाढले आहे. चौका- चौकात आणि प्रत्येक ठिकाणी बॅनरचे

Eknath Shinde : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप-शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय; शिवसेनेचा सचिन सानप यांना पाठिंबा

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या जनसेवेबद्दल राज्य मंत्रिमंडळाकडून अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी मांडला प्रस्ताव

महाराष्ट्रातील १२ लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांसह विविध योजनांचा गौरव मुंबई : घटनात्मक पदावर राहून सलग २५