गुजरातमध्ये ५,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी

नवी दिल्ली : गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे ५,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झाली. रेल्वे, रस्ते, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासारख्या अनेक क्षेत्रांचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे.


आधी गोविंद गुरुजींची पुण्यतिथी आणि नंतर सरदार पटेल जी यांची जयंती असल्याने ३० आणि ३१ ऑक्टोबर या दोन तारखा प्रत्येकासाठी खूप प्रेरणादायी आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. “आमच्या पिढीने जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारून सरदार साहेबांबद्दल आदर व्यक्त केला आहे”, असे मोदी म्हणाले. गोविंद गुरुजींचे जीवन हे भारताच्या स्वातंत्र्यात आदिवासी समाजाच्या योगदानाचे आणि बलिदानाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत सरकारने मानगड धामचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


तत्पूर्वी आज अंबाजी मंदिरात दर्शन आणि पूजा केल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि अंबाजी देवीचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. गब्बर पर्वताचा विकास करून त्याची भव्यता वाढविण्याच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. आजच्या प्रकल्पांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, माता अंबेच्या आशीर्वादाने सुमारे ६००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे संपर्क व्यवस्था आणखी सुधारेल आणि या भागातील शेतकऱ्यांना फायदा होईल. "मेहसाणा, पाटण, बनासकांठा, साबरकांठा, महिसागर, अहमदाबाद आणि गांधीनगरच्या आसपासच्या जिल्ह्यांनाही या प्रकल्पांचा फायदा होईल," असे ते पुढे म्हणाले. आजच्या प्रकल्पांसाठी त्यांनी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले.


गुजरातच्या विकासासाठी नर्मदा आणि मही या नद्यांच्या पाण्याचा वापर करणाऱ्या सुजलाम-सुफलाम् योजनेवर त्यांनी प्रकाश टाकला. जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी साबरमतीवर ६ बंधारे बांधले जात असल्याची माहिती मोदी यांनी दिली. यातील एका बंधाऱ्याचे आज उद्घाटन झाले आहे. आपल्या शेतकऱ्यांना आणि डझनभर गावांना याचा मोठा फायदा होईल”, असे ते म्हणाले.


या सिंचन प्रकल्पांमुळे उत्तर गुजरातमधील सिंचनाचे प्रमाण 20-22 वर्षांत अनेक पटींनी वाढल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सूक्ष्म सिंचनाच्या नवीन तंत्रज्ञानाचा उत्तर गुजरातच्या शेतकऱ्यांनी लगेच अवलंब केला, असे पंतप्रधानांनी नमूद केले आणि बनासकांठामधील 70 टक्के क्षेत्रावर नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. येथील शेतकरी आता बडीशेप, जिरे आणि इतर मसाल्यांसोबत गहू, एरंड, भुईमूग आणि हरभरा अशी अनेक पिके घेऊ शकतात. देशातील 90 टक्के इसबगोल गुजरातमध्ये प्रक्रिया करून त्याला एक वेगळी ओळख दिली जाते अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यांनी वाढत्या कृषी उत्पादनाबद्दलही नमूद केले आणि बटाटे, गाजर, आंबा, आवळा, डाळिंब, पेरू आणि लिंबू यांचा उल्लेख केला.डीसा हे शहर बटाट्याचे सेंद्रिय शेती केंद्र म्हणून विकसित करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. बनासकांठामध्ये बटाट्यांवर प्रक्रिया करण्यासाठी मोठे संयंत्र उभारण्याचा उल्लेख मोदी यांनी केला. मेहसाणा येथे बांधलेल्या अॅग्रो फूड पार्कचाही त्यांनी उल्लेख केला आणि बनासकांठामध्ये असाच मेगा फूड पार्क बनवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याविषयी सांगितले आणि गुजरातमध्ये सुरू झालेल्या एका जलसंधारण योजनेने आता देशासाठीच्या जल जीवन अभियानाचे रूप घेतले असल्याचे सांगितले. "हर घर जल अभियानाने गुजरातप्रमाणेच देशातील कोट्यवधी लोकांचे जीवनमान बदलत आहे", असे ते म्हणाले.


पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या विकासाचा सर्वात मोठा फायदा महिलांना झाला आहे, असे नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, उत्तर गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत शेकडो नवीन पशुवैद्यकीय रुग्णालये बांधण्यात आली आहेत ज्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहिले आहे आणि परिणामी दुग्ध उत्पादन वाढले आहे. गेल्या दोन दशकांत उत्तर गुजरातमध्ये 800 हून अधिक नवीन ग्रामीण दुग्ध सहकारी संस्था स्थापन झाल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. “बनास डेअरी असो, दूध सागर असो किंवा साबर डेअरी असो, त्यांचा अभूतपूर्व विस्तार केला जात आहे. दुधाव्यतिरिक्त, या दूध डेऱ्या शेतकऱ्यांच्या इतर उत्पादनांसाठीही महत्त्वाची प्रक्रिया केंद्रे बनत आहेत,” असेही ते म्हणाले.


केंद्र सरकार पशुधनाच्या मोफत लसीकरणासाठी एक मोठी मोहीम राबवत असून त्यासाठी 15,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी यावेळी परिसरातील पशुपालकांना आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहनही केले. देशात गोबरधन योजनेंतर्गत अनेक संयंत्रे उभारली जात असून त्याच्या माध्यमातून तिथे गाईच्या शेणापासून मोठ्या प्रमाणावर बायोगॅस आणि बायो सीएनजी निर्मिती होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


पंतप्रधान मोदी यांनी आजच्या 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या रेल्वे प्रकल्पांविषयी बोलताना मेहसाणा आणि अहमदाबाद दरम्यानच्या रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉरचा विशेष उल्लेख केला. यामुळे उत्तर गुजरातचे पिपावाव, पोरबंदर आणि जामनगर या प्रमुख बंदरांशी दळणवळण अधिक सुधारेल असे त्यांनी नमूद केले. या कॉरिडॉरमुळे उत्तर गुजरातमधील लॉजिस्टिक आणि साठवणुकीशी संबंधित उद्योग क्षेत्राच्या वाढीला अधिक बळकटी मिळेल, असेही ते म्हणाले.


देशातील हरित हायड्रोजन आणि सौरऊर्जा निर्मितीविषयी बोलताना, पंतप्रधानांनी पाटण आणि नंतर बनासकांठा येथील सौरऊर्जा प्रकल्पांचा उल्लेख केला. मोढेरा हे गाव 24 तास सौर उर्जेवर चालणारे गाव असल्याचा आपल्याला अभिमान आहे असे ते म्हणाले.


गेल्या 9 वर्षांत अंदाजे 2,500 किमी पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकांचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. यामुळे प्रवासी गाड्या आणि मालगाड्यांना लागणारा प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. हरियाणातील पालनपूर ते रेवाडी या मार्गावर धावणा-या गाड्यांमधून होणाऱ्या दुधाच्या वाहतुकीचाही त्यांनी उल्लेख केला. काटोसन रोड-बेचराजी रेल्वेमार्ग आणि विरमगाम-सामखियाली ट्रॅकच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे ‘कनेक्टिव्हिटी’ अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले.


पंतप्रधानांनी गुजरातमध्‍ये पर्यटन क्षेत्रामध्‍ये असलेल्या मोठ्या क्षमतेवर प्रकाश टाकला आणि जगप्रसिद्ध कच्छ रण उत्सवाचा उल्लेख केला. नुकतेच जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून ओळखल्या गेलेल्या कच्छमधील धोरडो गावाचाही त्यांनी उल्लेख केला. उत्तर गुजरात हे देशातील प्रमुख पर्यटन स्थळ बनत असल्याचे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Jamui Crime : भररस्त्यात मुलीला अडवून नको तिथे स्पर्श; व्हायरल व्हिडिओतील 'ती' धक्कादायक दृष्यं पाहून संतापाची लाट!

दहावीच्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तरुणांकडून त्रास; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 3 जणांना अटक जमुई :

National Film Awards 2026 : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी! अंतिम टप्प्यात तयारी, चित्रपटसृष्टीत उत्सुकता

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

IIT Bombay student suicide : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : डीन प्रा. सूर्यनारायण दुल्ला निलंबित; संस्थेकडून माफीनामा जारी

मुंबई : आयआयटी मुंबईतील (IIT Bombay) 'ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी' विभागाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या

India New Zealand FTA : भारताला दसऱ्याची मोठी भेट! भारत-न्यूझीलंड 'मुक्त व्यापार करार' २० ऑक्टोबरपासून लागू!

'ड्युटी फ्री' प्रवेशामुळे नक्की काय फायदा होणार ? नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील व्यापारी आणि

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली 'हनुमान अंश' चित्रपटाच्या टीमची भेट! दिल्या खास शुभेच्छा

नीम करौली बाबा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राजधानी नवी

Flight Emergency Landing : बँकॉकहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे लखनऊत मेडिकल इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने धावपळ

लखनऊ :