Jamui Crime : भररस्त्यात मुलीला अडवून नको तिथे स्पर्श; व्हायरल व्हिडिओतील 'ती' धक्कादायक दृष्यं पाहून संतापाची लाट!

दहावीच्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तरुणांकडून त्रास; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 3 जणांना अटक


जमुई : बिहारमधील जमुई जिल्ह्यात अल्पवयीन मुलगा आणि मुलीला रस्त्यात अडवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली असून, इतर सहभागींचा शोध सुरू आहे.




नेमकं काय घडलं ? 















मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून जात असताना काही जणांनी त्यांना रस्त्यात थांबवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संबंधित मुला-मुलीशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ काही जणांनी रेकॉर्ड केला आणि तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हिडिओ समोर आल्यानंतर जमुई पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. जमुईच्या पोलीस अधीक्षकांनीही व्हिडिओ आणि घटनेची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी पीडित मुलगा आणि मुलीशी संवाद साधून त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे.

प्राथमिक तपासात या घटनेत सुमारे 6 ते 7 जण सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून व्हिडिओच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली जात असून, इतर संशयितांचा या घटनेत नेमका सहभाग किती होता, याचाही तपास केला जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण सुरू केले आहे. घटनेमागील नेमके कारण काय होते, तसेच या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरण असल्याने त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई सुरू आहे.

 

















Comments
Add Comment

आंध्र प्रदेशात 'मुरासू' चक्रीवादळाचा हाहाकार; 8 जणांचा मृत्यू, तब्बल 1900 कोटींहून अधिकचे अवाढव्य नुकसान!

अमरावती: आंध्र प्रदेशात 'मुरासू' (Murasu) चक्रीवादळाने अभूतपूर्व विध्वंस घडवला असून संपूर्ण राज्यात मानवी जीवनासह

SBI ची 904 कोटींची फसवणूक? किशोर बियाणी आणि फ्युचर रिटेलविरोधात CBI चा FIR!

मुंबई: देशातील अग्रगण्य रिटेल समूहांपैकी एक असलेल्या 'फ्युचर रिटेल लिमिटेड'च्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

इयत्ता १०वी आणि १२वीच्या सीबीएसई बोर्डच्या परीक्षा जाहीर; १६ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात

सीबीएसई बोर्डच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

दक्षिण दिल्लीतील किया कार शोरूमला भीषण आग; 7 जण जखमी, 12 ते 15 जणांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सैदुलाजाब परिसरात असलेल्या किया कार शोरूमला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची

स्पाइसजेटच्या मनमानीचा भडका! बंगळुरू विमानतळावर प्रवाशांचा संताप अनावर; अन् थेट कर्मचाऱ्यालाच.....

बंगळुरू: विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 5 नोव्हेंबर 2026 रोजी

Amit shah uttarakhand visit : उत्तराखंडला अमित शाहांची १५०८ कोटींची 'दिवाळी भेट'; राहुल बाबाच्या 'व्होट बचाओ यात्रे'वर कडाडून टीका

देहरादून : उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी