एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद, ६०० कोटींचा सामंजस्य करार


नागपूर : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.


विधानभवन येथे झालेल्या या करारप्रसंगी उद्योग मंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष उदय सामंत, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटीया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व एसटीचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील १९३ बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण होणार असून आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.


राज्यभरात एसटीची ६०९ बसस्थानके आहेत. त्यापैकी सध्या ५६३ बसस्थानके कार्यरत आहेत. बसस्थानक परिसरातील खड्डे, पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. एसटी बसेसचे देखील नुकसान होते. यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटीच्या अमृतमहोत्सवी समारंभात केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात एमआयडीसी १९३ एसटी बसस्थानकांच्या कॉक्रिटीकरणासाठी ५०० कोटी रुपये व रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती करण्याची १०० कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे. यातून लवकरच या सर्व बसस्थानकांचा कायापालट होणार आहे.


एमआयडीसीच्या या प्रतिसाद आणि पुढाकाराने मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले. राज्यातील लोकाभिमुख सुविधा आणि अग्रेसर अशा उद्योग विभागाचे नवे सहकार्य पर्व सुरू होणार आहे. यातून एक वेगळे उदाहरण पुढे आल्याचेही, त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी

दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना सरकारचा दिलासा! परीक्षा शुल्काबाबत उच्च- तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिलासा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून

राज्यातील 304 तालुके दुष्काळग्रस्त घोषित; शेतकऱ्यांना मिळणार 12 सवलती!

राज्यातील ट्रिगर-1 आणि ट्रिगर-2 लागू झालेल्या एकूण 304 तालुक्यांना अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! पुण्याच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये 50 एमबीबीएस जागांना मंजुरी, मुख्यमंत्र्यांकडून खास 'नवरात्री भेट'

मुंबई : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी