Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२६-२७ संदर्भात महत्त्वाची बातमी! केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद आणि तूर या पिकांच्या खरेदीसाठी राज्यात व्यापक नियोजन करण्यात येत आहे. मंत्री जयकुमार रावल यांनी खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि शेतमालाच्या साठवणुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी राज्यातील केंद्रांवर शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाच्या साठवणुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. खरीप हंगामातील हमीभाव खरेदीच्या पूर्वनियोजनाबाबत आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.



हमीभावात भरीव वाढ


खरीप हंगाम 2026-27 साठी केंद्र शासनाकडून शेतमालाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीनच्या हमीभावात 380 रुपयांची वाढ होऊन तो 5 हजार 328 रुपयांवरून 5 हजार 708 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. तसेच उडदाचा हमीभाव 400 रुपयांनी वाढून 8 हजार 200 रुपये आणि तुरीचा हमीभाव 450 रुपयांनी वाढून 8 हजार 450 रुपये प्रति क्विंटल झाला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.



साठवणुकीसाठी 15.28 लाख मेट्रिक टन क्षमता


खरेदी करण्यात येणाऱ्या कडधान्ये व तेलबियांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या स्वमालकीच्या 168 वखार केंद्रांबरोबरच गरजेनुसार भाडेतत्त्वावरील गोदामांचा वापर केला जाणार आहे. सद्यस्थितीत स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील गोदामांमध्ये 8.12 लाख मेट्रिक टन रिक्त साठवणूक जागा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी खासगी गोदामांचे नियोजन करून आणखी 7.16 लाख मेट्रिक टन आंतरिक क्षमता उपलब्ध होणार असून, याद्वारे एकूण 15.28 लाख मेट्रिक टन साठवणूक जागा उपलब्ध होईल, असे नियोजन वखार महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.



शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा आणि क्यूआर कोड टॅगिंग


सर्व खरेदी केंद्रांवर येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हँगिंग व बसण्याची व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्यात. किंमत समर्थन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बारदाना, वाहतूक आणि गोदामांची योग्य व्यवस्था करावी. तसेच, पारदर्शकता राखण्यासाठी संबंधित राज्यस्तरीय नोडल संस्थांच्या सर्व खरेदी केंद्रांवर क्यूआर कोड टॅगिंगची व्यवस्था करण्याचे निर्देशही मंत्री रावल यांनी दिले आहेत.



950 हून अधिक खरेदी केंद्रांची यंत्रणा आणि व्यापक प्रसिद्धी


या हंगामात नाफेडमार्फत 22 जिल्ह्यांत, तर एनसीसीएफमार्फत सहा जिल्ह्यांत खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार असून राज्यात 950 हून अधिक खरेदी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मुंबई), विदर्भ सहकारी पणन महासंघ (नागपूर) आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (पुणे) या राज्यस्तरीय नोडल संस्था सहभागी होणार आहेत. शासनाच्या निश्चित सूचीनुसार ही केंद्रे कार्यान्वित केली जातील. हमीभाव योजनेची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक केंद्रावर माहिती फलक लावण्यासह दूरचित्रवाणी, आकाशवाणी, प्रसिद्धीपत्रके व डिजिटल माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्याचे ठरवण्यात आले असून, नोंदणी व खरेदी यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळही उपलब्ध केले जाणार आहे.


या बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, मार्कफेडचे कार्यकारी संचालक अशोक करंजकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, सहसचिव विजय लहाने, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड यांच्यासह नाफेड आणि एनसीसीएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना सरकारचा दिलासा! परीक्षा शुल्काबाबत उच्च- तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिलासा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून

राज्यातील 304 तालुके दुष्काळग्रस्त घोषित; शेतकऱ्यांना मिळणार 12 सवलती!

राज्यातील ट्रिगर-1 आणि ट्रिगर-2 लागू झालेल्या एकूण 304 तालुक्यांना अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! पुण्याच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये 50 एमबीबीएस जागांना मंजुरी, मुख्यमंत्र्यांकडून खास 'नवरात्री भेट'

मुंबई : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी

भटक्या-विमुक्तांच्या पुनर्वसनासाठी एक रुपयात जागा देणार; २९ ऑक्टोबरपर्यंत जागांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबई : पालावर आणि तात्पुरत्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या भटक्या-विमुक्त समाजाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी