जेवणानंतर प्रत्येकवेळी ग्रीन टी पिता का? जाणून घ्या योग्य की अयोग्य

मुंबई: ग्रीन टी हे एक असे अमृत आहे जे आपल्या इम्युन सिस्टीमसाठी अमृतापेक्षा कमी नाही. यामुळे केवळ वजनच घटत नाही तर ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि जुन्या आजारांमध्येही फायदा होतो. अनेकजण ग्रीन टी हेल्दी असल्याने वारंवार सेवन करतात. खासकरून जेवण केल्यानंतर ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याबाबत जाणून घेऊया...



जेवल्यानंतर ग्रीन टी घेणे योग्य आहे का?


अनेकदा लोकांचा प्रश्न असतो की ग्रीन टी कधी घेतला पाहिजे. अनेकजण जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन करतात. आरोग्य तज्ञांच्या मते जर हेवी जेवण कले तर ग्रीन टी घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ग्रीन टीमुळे जेवण पचण्यास मदत होते. यातील अँटी ऑक्सिडंट आणि कॅटेचिन मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात. तसेच पाचनशक्ती सुधारतात. दरम्यान, जेवण कमी घेतले असेल तर ग्रीन टीचे सेवन करू नये.



दिवसातून किती वेळा करावे ग्रीन टीचे सेवन


आता दिवसांतून किती वेळा ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. ग्रीन टी पिण्याची सगळ्यात योग्य वेळ वर्कआऊटच्या आधी असते. कारण यामुळे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते. इतकंच नव्हे तर ग्रीन टी मेटाबॉलिज्म रेट आणि फॅट बर्न करण्यासही मदत करते. दरम्यान, केवळ कोणतेही ड्रिंक वजन कमी करण्यात तुम्हाला मदत करू शकत नाही. यासोबतच बॅलन्स डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईलही तितकीच गरजेची असते. तज्ञांच्या मते तुम्ही दिवसात २ ते ३ कप ग्रीन टीचे सेवन करू शकता.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित