Poems : काव्यरंग

जगू कशी तुझ्याविना...
श्वास श्वास कोंडताना
साद न येई हाकेला
दूर जाता कलेवर
हुंदकाही अडलेला...

हात तुझा हातातला
सोडवेना सख्या मला
सनईच्या सूरातली
शांत झाली रागमाला...

दर्दभऱ्या एकांताच्या
राती कितीक झेलल्या
ओघळत्या आसवांनी
माझ्या पापण्या गोठल्या...

मुकपणा विरलेले
शब्द होते सोबतीला
उजागर झुल्यावर
पीळ बसतो मनाला...

सांगूनिया जा मजसी
असा काय माझा गुन्हा
परतीच्या पावलांनी
रंग भरावे तू पुन्हा...

संकटाच्या वादळाचा
ढग अंगावर आला
जगू कशी तुझ्याविना
पूर अश्रूंचा वाहिला...

- पूजा काळे, बोरिवली

वसंतोत्सव


नवचैतन्ये वसंत नटला
तरुवेलींचा सुगंध सुटला ||धृ||

बहावा तरी सुंदर सजला
पर्णपाचुतुनी.बहरु लागला
पीतफुलांनी डोलत सुटला
पांथस्थांना सुखवु लागला ||१||

गुलमोहराच्या पायघड्यांनी
रस्ता सारा मखमली बनला
रक्तवर्ण हा तळपू लागला
ग्रीष्मासंगे फुलून आला ||२||

पळस,पांगिरा फुलांनी नटला
हिरव्या कोंदणी ठसा उमटला
मनासी वेधत खुलवू लागला
संगतीने ग्रीष्मात हरवला ||३||

आम्रतरुही मोहोरुनी गेला
कैरीफळांचे तोरण ल्याला
कोकिळ कूजनी रंगुन गेला
आमराईचे भूषण बनला ||४||

- दीप्ती कोदंड-कुलकर्णी, कोल्हापूर.
Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व