कपालेश्वर मंदिरात पूजेचा अधिकार कुणाला?

गुरव कंपनीचे भांडण निवाड्यासाठी न्यायालयाच्या दरबारात


नाशिक : भोळ्या महादेवासमोर नंदी नसलेले पृथ्वी तलावरील एकमेव मंदिर म्हणून प्रख्यात असलेले नाशिकच्या रामकुंडावरील कपालेश्वर महादेव मंदिर अलीकडच्या काळात वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने पुजारीच पावित्र्य कलंकित करीत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या आधी विश्वस्त आणि पुजारी यांच्यात सुरु असलेले शीतयुद्ध, दानपेटीबाबतचे राजकारण करणाऱ्या पुजाऱ्यांच्या वर्तनामुळे भोळा म्हणून ओळखला जाणारा महादेव नाहक बदनाम होत आहे आणि आता तर मंदिरात पूजा कुणी करायची याबाबत नव्याने वाद उपस्थित केला गेला असून थेट जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला आहे.


यातील वादी प्रभाकर श्रीधर गाडे शामराव श्रीधर गाडे,ॲड अविनाश श्रीधर गाडे,प्रसाद शरदचंद्र गाडे,जगदीश शरदचंद्र गाडे, रुपाली हेमंत गाडे, मिलिंद अरविंद गाडे यांनी हेमंत उर्फ पप्पू पद्माकर गाडे, प्रकाश उर्फ साहेबराव पद्माकर गाडे, प्रभावती चंद्रकांत जगताप, अनिल जनार्दन भगवान, रमाकांत सोनोजी शेवाळे, अनिता अनिल शेवाळे यांच्याविरुद्ध नशिक जिल्हा न्यायालयात स्पेशल सिव्हिल सुट क्र. 0000255/2024 Specific relief act ३४,३८ प्रमाणे दाखल केला असून या दाव्यामुळे कपालेश्वर मंदिरात कोणते गुरव पूजा करू शकतात याबाबत नागरिकांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.



नेमका हा वाद का?


दानपेटी मधील पैशावरून हा वाद झाला आहे अशी चर्चा बऱ्याच दिवसापासून शहरात सुरु आहे. ज्यांनी दावा दाखल केला ते वादी यांना प्रतिवादी हेमंत उर्फ पपू पद्माकर गाडे हा मंदिरात येण्यापासून रोखत आहेत. सदर वाद हा मागील २० दिवसापासून चालू असून दावा दाखल केलेले गुरव आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रतिवादी पप्पू उर्फ हेमंत पद्माकर गाडे हा मंदिरात येण्यापासून थांबवत असून मंदिरात येणारे दानपेटी मधील सर्व पैसे स्वतःच घेत असल्याचा आरोप काही भक्त करीत आहेत.


नाशिक शहरातील अतिप्राचीन असलेले कपालेश्वर महादेव मंदिर येथे गुरव लोकांमध्ये मध्ये वाद चालू आहे. त्या अनुषंगाने गुरव ॲड अविनाश श्रीधर गाडे यांच्या बाजूने ७ परीवार तर यांनी गुरव हेमंत उर्फ पपू गाडे यांच्या बाजूने ६ परीवार यांच्या विरोधात नाशिक न्यायालयात एक सूट दाखल केला असून उद्या त्यावर नाशिक न्यायालयात सुनावणी आहे. संबंधित गुरव यांच्या ताब्यात एक दानपेटी असून सदर दानपेटी मध्ये येणाऱ्या पैशातून हा वाद निर्माण झाला आहे. ॲड अविनाश गाडे यांनी दाखल केलेल्या सूटमध्ये १० लाख रुपये दानपेटीमध्ये आलेले असून त्याची नुकसान भरपाई ही वादी ॲड अविनाश गाडे व इतर गुरव यांनी मिळावी यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला आहे असे समजते. - प्रशांत जाधव, अध्यक्ष, कपालेश्वर संस्थान

Comments
Add Comment

Lalbaugcha Raja Crowd : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन्‌तास रांग; भाविकांना धक्काबुक्कीचा VIDEO व्हायरल!

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. अनेक भावि

Nashik : नागरी प्रश्नांचा आढावा, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा; महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासह श्री गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पूर्वतयारीचा

Nashik News : गंगापूर रोडवर मध्यरात्री झाडांची अनधिकृत छाटणी, ‘छोटा हत्ती’ वाहन सीसीटीव्हीत कैद

Nashik Tree Cutting News : नाशिकच्या गंगापूर रोडवरील काका का ढाबा ते बॉबीज हॉटेलदरम्यान मध्यरात्री झाडांची अनधिकृतपणे छाटणी

Nashik Accident News : सर्व्हिसरोडवर भीषण अपघात ! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या गोविंदनगरजवळील डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूचं डोहाळे जेवण थाटामाटात पार पडलं; पती राज निदिमोरूच्या 'त्या' कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले

Samantha Ruth Prabhu Baby Shower : सुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच आई होणार आहे. ती आणि तिचे पती

Bigg Boss Telugu 10: हिंदी सोडा, बिग बॉस तेलुगुमध्ये 'या' स्पर्धकाचीच चर्चा; एका एपिसोडसाठी घेतोय लाखोंचं मानधन

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये एकच शो सुरू झाला आहे.