तालिबान्यांकडून अफगाणी महिलांना क्रूर शिक्षा; संयुक्त राष्ट्रांकडून जोरदार टीका

तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याचा एक ऑडिओ मेसेज नुकताच व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांचा पाश्चात्य लोकशाहीविरुद्ध लढा सुरूच राहील असेही जाहीर केले आहे. ऑडिओ मेसेजमध्ये तालिबानच्या या नेत्याने व्याभिचार करणाऱ्या अफगाण महिलांना चाबकाचे फटके आणि दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा देणार असल्याचे म्हणत आहे. यामध्ये हिबतुल्ला अखुंदजादा पाश्चात्य अधिकाऱ्यांना उद्देशून "जेव्हा आम्ही त्यांना दगडाने ठेचून मारू, तेव्हा तुम्ही याला महिलांच्या हक्कांचे उल्लंघन म्हणाल. पण आम्ही लवकरच व्यभिचाराच्या शिक्षेची अंमलबजावणी करू. आम्ही महिलांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारू. आम्ही त्यांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून ठार मारू,” असे म्हणत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यापासून काही जुने फोटो सोडले तर अखुंदजादाला कोणीही सार्वजनिकरित्या पाहिले नाही. तो तालिबानचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण कंदाहारमध्ये असल्याची माहिती सतत समोर येत असते. अफगाणिस्तानचा सरकारी टीव्ही तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे. याद्वारे अखुंदजादा याचे व्हॉइस मेसेजेस प्रसारित केले जातात. अधिक लोकाभिमुख सरकारचे आश्वासन देऊनही, तालिबानने पुन्हा एकदा क्रूर सार्वजनिक फाशी आणि फटके मारण्यासारख्या कठोर शिक्षा पुन्हा सुरू केल्या आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी तालिबानवर जोरदार टीका करत देशाच्या राज्यकर्त्यांना अशा पद्धती थांबवण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये अखुंदजादा म्हणाला की, आंतरराष्ट्रीय समुदाय ज्या महिलांच्या हक्कांसाठी वकिली करत आहे ते तालिबानच्या इस्लामिक शरियाच्या कठोर व्याख्याच्या विरोधात आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानमध्ये मध्ये संताप निर्माण झाला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी काहींनी आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानवर दबाव वाढवण्याचे आवाहन केले आहे.

 

 

 
Comments
Add Comment

ITBP स्थापना दिन : पंतप्रधान मोदींकडून ‘हिमवीरांना’ सलाम ! भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या शौर्याचे केले कौतुक

नवी दिल्ली : भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (ITBP) ६५ व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी,

Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; ओडिशा, आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात उष्णता कायम

Weather News: बंगालच्या उपसागरातील हवामानात बदल होत असून, पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 24 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी; 30 ऑक्टोबर रोजी हप्ता जमा होण्याची शक्यता

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-Kisan) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली

PM Modi Chinmaya Amrit Mahotsav : 'देशाच्या विकासासाठी एकत्र या'; चिन्मय अमृत महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे भाषण

नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण जो 'अमृत महोत्सव' साजरा केला, तो केवळ एक

Air India Emergency Landing : एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ करताच घेतला यू-टर्न; 109 प्रवाशांचा जीव मुठीत

हैदराबाद: उड्डाण भरताच विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. हैदराबादहून

Loktak Lake Manipur : 'लोकटक तलावा'च्या संवर्धनासाठी मणिपूर सरकारचा मोठा निर्णय, 'लोकटक दिन' आता राज्य महोत्सव

इंफाळ : ईशान्य भारतातील सर्वांत मोठ्या गोड्या पाण्याच्या 'लोकटक तलावा'चे सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक