नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-Kisan) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, केंद्र सरकार आगामी 30 ऑक्टोबर 2026 रोजी या योजनेचा 24 वा हप्ता जारी करण्याची दाट शक्यता वर्तवत आहे. या अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांच्या थेट बँक खात्यात (DBT द्वारे) प्रत्येकी 2000 रुपये जमा केले जातील.
या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून दरवर्षी एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते. यापूर्वीचा 23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये देशातील 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18,880 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून आतापर्यंत 4.46 लाख कोटी रुपयांहून अधिकची रक्कम थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली गेली आहे.
हे नियम पूर्ण करणे बंधनकारक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची पूर्तता करणे अनिवार्य आहे:
ई-केवायसी (e-KYC): ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे, त्यांनाच 24 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
आधार-बँक लिंकिंग: बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
जमिनीच्या नोंदी: जमिनीच्या नोंदी अद्ययावत नसल्यास हप्त्याचे पैसे अडकू शकतात.
नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण जो 'अमृत महोत्सव' साजरा केला, तो केवळ एक सोहळा नव्हता. तर तो आपल्या जुन्या ...
आपली स्थिती कशी तपासायची?
शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन 'Know Your Status' या सुविधाच्या माध्यमातून आपल्या अर्जाची आणि हप्त्याची स्थिती तपासून घ्यावी. तसेच, सोशल मीडियावर 24 व्या हप्त्याबाबत येणाऱ्या 4000 रुपयांच्या दुहेरी रकमेच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, कोणतीही खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी.