Nitesh Rane : इंडिया आघाडीला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत!

काँग्रेस जिंकल्यास भारताच्या नाक्यानाक्यावर पाकिस्तानचे झेंडे दिसतील


हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे


भाजपा आमदार नितेश राणे यांचा घणाघात


मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत आज ठाकरे गटाचंच मुखपत्र असलेल्या 'सामना' (Saamana) वर्तमानपत्रात छापून आली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी 'भाजपमुक्त राम पाहिजे' अशी टीका केली. यावर भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. यासोबतच त्यांनी पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या इंडिया आघाडी (INDIA Alliance) आणि मविआवर (Mahavikas Aghadi) घणाघात केला आहे. 'इंडिया आघाडीला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत, त्यामुळे विचार करुन मत द्या', असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.


नितेश राणे म्हणाले, इंडिया अलायन्सच्या नावाने आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नावाने मुस्लीम लीगची भाषा करणारे, मुस्लीम लीगची हिरवी पिल्लावळ म्हणून महाराष्ट्रात वळवळ करणारे हे लोक आहेत. उद्या जर आपण इंडिया अलायन्सला आपण मत दिलं तर आपल्याला भारताच्या नाक्यानाक्यावर पाकिस्तानचे झेंडे दिसतील. जिथे आपण आज रामभक्त म्हणून दुकानाबाहेर किंवा घराबाहेर भगवे झेंडे फडकवतोय, त्याचीही परवानगी आपल्याला भारतामध्ये राहून मिळणार नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर काय झालंय ते पाहा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.


पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात कोरोनाच्या नावाने जसं सगळ्या सणासुदींवर बंदी घातली होती आणि दुसर्‍या बाजूला मोहरम आणि ईदच्या जोरदार मिरवणुका निघत होत्या तीच परिस्थिती उद्या इंडिया अलायन्स आणि मविआची लोकं निवडून आल्यानंतर भारतात होणार. तुम्ही सार्वजनिक हिंदूंचे उत्सव सोडा, तुमच्या घरातील मंदिराची पूजा करण्याची परवानगी तरी तुम्हाला देतील का इथपासून प्रश्न निर्माण होतील.


इंडिया अलायन्सच्या नावाने जे काही मतदान होतंय, जे काही फतवे निघतायत, ते धर्माच्या आधारे निघतायत, राष्ट्रभक्तांसाठी निघत नाही आहेत. संजय राजाराम राऊत हा कार्टा जे सकाळी बोलत होता की राष्ट्रभक्तांसाठी फतवे निघत आहेत, त्या कार्ट्याला हे पण कळत नाही की धर्माच्या आधारे मुसलमान लोकांनी फक्त इंडिया आघाडी आणि मविआला मतदान करावं कारण 'हमारा धर्म खतरे में है', याला राष्ट्रभक्ती म्हणत नाहीत. म्हणून इंडिया आघाडी आणि मविआला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत, असं नितेश राणे म्हणाले.



हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे


ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणाले की राम मंदिर आम्हाला भाजपमुक्त करायचं आहे त्याप्रमाणे आम्हालाही हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे. कारण उद्धव ठाकरेची हिरवी टोळी जो हिंदू समाजाचा द्वेष करत आहे, त्या सगळ्याला नष्ट करण्याचं काम या देशाची जनता निश्चित पद्धतीने करेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर