काव्यरंग

सांग कधी कळणार तुला


सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला


रंग कधी दिसणार तुला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला


गंधित, नाजूक पानांमधुनी
गंधित, नाजूक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी
गंधित, नाजूक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी


अर्थ कधी कळणार तुला
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला
सांग कधी कळणार
तुला भाव माझ्या मनातला


निळसर, चंचल पाण्यावरती
निळसर, चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
निळसर, चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती


छंद कधी कळणार तुला
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला
सांग कधी कळणार
तुला भाव माझ्या मनातला



गीतकार- मधुसूदन कालेलकर

Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व