Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा; निमंत्रण पत्रिका आली समोर

दोन दिवस दिल्लीत नो फ्लायझोन; 'अशी' असेल त्रिस्तरीय सुरक्षा


नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची (Oath ceremony) निमंत्रण पत्रिका समोर आली असून या पार्श्वभूमीवर दिल्लीत (Delhi) मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली हाय अलर्टवर ठेवली असून जमिनीपासून आकाशापर्यंत कडक सुरक्षा करण्यात आली आहे.



नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनुथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.



दोन दिवस दिल्लीत नो फ्लाइंग झोन


नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी देशाची राजधानी दिल्लीला रविवारपासून पुढील दोन दिवस नो फ्लाइंग झोन घोषित केला आहे. या कालावधीत पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर, हँग ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, हॉट एअर बलून, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट आणि रिमोट ऑपरेटेड एअरक्राफ्टच्या उड्‌डाणावर बंदी घातली आहे.


सुरक्षेसाठी एसपीजी. राष्ट्रपती सुरक्षा रक्षक, आयटीबीपी, दिल्ली पोलीस, गुप्तचर विभागाचे पथक निमलष्करी दल, एनएसजी ब्लॅक कॅट कमांडो आणि एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा क्षेत्रात कोणतेही अनधिकृत वाहन येऊ नये यासाठीही सखोल तपासणी करण्यात येत आहे.



'अशी' असेल त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था



  • आतील स्तर - राष्ट्रपती भवन आणि कर्तव्य पथ भोवती उच्च सुरक्षा क्षेत्र असेल, येथे शपथविधी होणार आहे.

  • बाहेरील स्तर - परदेशी राष्ट्रपमुख आणि प्रतिष्ठित व्यक्ती राहणार असलेली हॉटेल्सभोवती सुरक्षिततेचा दुसरा स्तर असेल. यामध्ये लाल, मौर्य, लीला आणि ओबेरॉय हॉटेल्सचा समावेश आहे

  • सर्वात बाहेरील सुरक्षा - मध्य दिल्लीच्या आसपास सुरक्षेचा तिसरा स्तर असेल. यामध्ये जमिनीपासून आकाशापर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Temple : नवरात्रीत देवीची अनोखी सजावट! तब्बल 4.42 कोटींच्या नोटांनी मंदिर सजवलं; पाहून व्हाल थक्क!

आंध्र प्रदेशातील अमलापूरम येथील श्री वासवी कन्यका परमेश्वरी अम्मावरू मंदिर सध्या आपल्या अनोख्या सजावटीमुळे

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; छातीत संसर्ग, प्रकृती स्थिर

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याने दिल्लीतील अपोलो

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास

Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम