Supreme Court Jobs: 10वी- 12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी, सर्वोच्च न्यायालयात बंपर भरती; साठ हजारांहून अधिक असेल पगार

Supreme Court Junior Court Attendant Recruitment: दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टामध्ये नोकरभरती आहे. जर तुम्ही सुद्धा केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आवश्यक आहे.

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम कोर्टामध्ये नोकरभरती केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर, ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये 130 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करण्याची संधी हव्या असणाऱ्या गरजू आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे.



भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, 'ज्युनिअर कोर्ट अटेंडंट' (Junior Court Atendant) पदासाठी एकूण 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी जर तुम्हाला अर्ज भरायची इच्छा असेल तर, तुमच्याकडे सरकारी मान्यताप्राप्त मंडळातून किमान दहावी ते बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या सर्व शैक्षणिक पात्रता असणाऱ्या कोर्सेसचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणंही महत्त्वाचं आहे. उमेदवाराचं वय 01 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना 05 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.



16 ऑक्टोबर 2026 पासून अर्थात आजपासून सुरू झालेल्या ह्या भरती प्रक्रियेचा शेवटचा दिवस 25 नोव्हेंबर 2026 हा शेवटचा दिवस असेल. ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज भरावा लागणार आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), दिव्यांग व्यक्ती (PwDs) आणि माजी सैनिक (ExSM) या उमेदवारांना ₹750 फी असेल, तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1500 फी भरावी लागणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दिल्लीमध्ये नियुक्ती दिली जाईल. 'ज्युनिअर कोर्ट असिस्टंट' वेतनाविषयी सांगायचे तर, 'पे मॅट्रिक्स'च्या लेव्हल 3 नुसार 21,700 रुपये ते 69,100 रुपये दरम्यान वेतनश्रेणी असेल. यामध्ये सुरुवातीचे मूळ वेतन (Basic Pay) 21,700 रुपये अधिक नियमानुसार इतर सरकारी भत्तांचा समावेश असेल. दरम्यान, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने परिक्षेची तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे. परिक्षेची तारीख 26 डिसेंबर 2026 असेल. याची परिक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Comments
Add Comment

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस

सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरची संधी? NISM चे 2 नवीन कोर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : आर्थिक आणि तांत्रिक सुरक्षेला बळ देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सने (एनआयएसएम) एक

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

शिमला शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या