काव्यरंग : भेट तुझी माझी स्मरते

भेट तुझी माझी स्मरते
अजून त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता,
गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातून
वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती
बाधा भीतीच्या विषाची ।।
क्षुद्र लौकिकाची
खोटी झुगारून नीती ।
नावगाव टाकूनी आली
अशी तुझी प्रीती ।
तुला परी जाणीव
नव्हती तुझ्या साहसाची ।।
केस चिंब ओले होते,
थेंब तुझ्या गाली ।
ओठांवर माझ्या त्यांची
किती फुले झाली ।
श्वासांनी लिहिली
गाथा प्रीतीच्या रसाची ।।
सुगंधीच हळव्या शपथा,
सुगंधीच श्वास ।
स्वप्नातच स्वप्न दिसावे
तसे सर्व भास ।
सुखालाही भोवळ
आली मधुर सुवासाची ।।



नभं उतरू आलं


नभं उतरू आलं,
चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं,
हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती,
गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती,
सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा,
एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा,
सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू,
उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू,
तुझ्याच पदरा ।।

Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व