Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या लाखो चाहत्यांनी अ‍ॅम्ब्युलन्सल वाट करून देत मानवतेचे दर्शन दिले.


लाखोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीने अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करून देत मानवतेचे तसेच धैर्यतेचे दर्शन दिले. लोकांनी बाजूला होत अ‍ॅम्ब्युलन्सला मोकळी वाट करून दिली. यावरून मुंबईकरांच्या एकतेचे दर्शन पाहायला मिळाले. तसेच एखाद्याच्या मदतीसाठी लाखो लोक मानसिकरित्या कसे एकत्र येऊ शकतात हे ही या कृतीतून दिसले.


 


टीम इंडियाने २९ जूनला खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकांत रोमहर्षक पद्धतीने हरवले होते. यासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने इतिहास रचला. भारताने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपचा खिताब आपल्या नावे केला. १३ वर्षांनी आयसीसी वर्ल्डकप ट्रॉफी भारतात आली.


याआधी २०११मध्ये भारताने ५० षटकांचा वर्ल्डकप आपल्या नावे केला होता. भारतात पोहोचताच सगळ्यात आधी टीम इंडिया दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटली. यानंतर संध्याकाळी ते विजयी परेडसाठी मुंबईत पोहोचले. येथे त्यांचे भव्य स्वागत केले जात आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून