Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताचा खेळ 246 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडे पहिल्या डावात 110 धावांची आघाडी आहे.

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. न्यूझीलंडने पहिल्या डावात 356 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 246 धावांवर आटोपला. यासह पहिल्या डावात न्यूझीलंड 110 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात भारतीय 246 धावांपर्यंत मजल मारेल की नाही याबाबतही शंका होती. मात्र ध्रुव जुरेलच्या झुंजार खेळीमुळे ते शक्य झालं. त्यामुळे भारत 110 धावांनी पिछाडीवर असला तरी काही अंशी दिलासा मिळाला आहे. भारताने 117 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या, यावरून अंदाज येतो. ध्रुव जुरेलने 170 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. त्याचं शतक हुकलं तरी भारताला संकटातून बाहेर काढण्यात त्याची खेळी महत्त्वाची ठरली .(TeamIndia)

भारताचा डाव


भारताचे आघाडीचे फलंदाज या सामन्यात सपशेल फेल गेले. यशस्वी जयस्वालला तर खातंही खोलता आलं नाही. केएल राहुल 25, देवदत्त पडिक्कल 21, कर्णधार शुभमन गिल 17, ऋषभ पंत 23, वॉशिंग्टन सुंदर 10 धावा करून बाद झाले. तर अंशुल कंबोजही खातं न खोलता तंबूत परतला. पण तळाच्या फलंदाजांनी थोडी फार ध्रुव जुरेलला साथ दिली. त्यामुळे त्याने हा डाव 246 धावांपर्यंत पुढे नेण्यात यश मिळवलं. आकाश दीप 29, गुरनूर ब्रार 10 धावा करून बाद झाले. तर जसप्रीत बुमराह नाबाद 4 धावांवर राहिला.(TestCricket)

न्यूझीलंडकडून काइल जेमिसन याने भारतीय संघाची दाणादाण उडवून दिली. त्याने 25.1 षटकात 69 धावा दिल्या आणि 4 विकेट काढल्या. तर मॅट हेनरी, नाथन स्मिथ आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी 2 विकेट काढल्या.
Comments
Add Comment

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात

रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार! IPL 2027 साठी मोठी घोषणा

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या

20 डिसेंबरला मैदानात उतरणार मेस्सी! टेवेझच्या निरोपाच्या सामन्यात तारे-तारकांची मांदियाळी; फुटबॉल चाहत्यांसाठी सुवर्णसंधी

जागतिक फुटबॉल विश्वासाठी एक अत्यंत रोमांचक आणि भावनिक बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल