Health: जेवल्यानंतर तुमचेही पोट फुगते का?

मुंबई: जेव्हा आपण जेवण खातो तेव्हा आपल्या पोटात गॅस निर्माण होतो. या गॅसमुळे पोट फुगते आणि आपल्याला कसेतरी होते. काही खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणि सवयी या समस्येला वाढवू शकतात.


हळू हळू खा - नेहमी हळू हळू आणि चावून खाल्ले पाहिजे. असे खाल्ल्याने जेवण व्यवस्थित पचते आणि गॅसची समस्या कमी होते.


कमी मसालेदार खाणे - मसालेदार आणि तळलेले पदार्थ पोट फुगण्याचे मोठे कारण असू शकते. यापासून बचावासाठी हलका आणि बॅलन्स डाएट घ्या.


फायबरयुक्त खाणे- फायबर पोटासाठी चांगले असते. सॅलड, फळे, हिरव्या भाज्या अधिक खा.


पाणी पिण्याची पद्धत बदला- जेवणानंतर लगेचच पाणी नका पिऊ. जर पाणी प्यायचेच असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी अथवा एका तासानंतर प्या.


ओव्याचे पाणी - जेवणानंतर ओव्याचे पाणी प्यायल्याने गॅसची समस्या कमी होते. नाहीतर हिंगाची पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटातून गॅस बाहेर निघतो.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे