PM Sheikh Hasina : बांगलादेशमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा!

लष्कराच्या विमानातून त्या भारताच्या दिशेने येत असल्याची माहिती


ढाका : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रचंड हिंसाचार (Bangladesh Violance) सुरु आहे. अनेक जणांनी यात आपला जीव गमावला आहे. त्यातच आता बांगलादेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्या व त्यांची बहीण देश सोडून सुरक्षित पण अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टरमधून शेख हसीना ढाक्यामधून भारताकडे रवाना झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मोठ्या संख्येनं आंदोलक पंतप्रधान शेख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.


बांगलादेशात सध्या अस्थिर वातावरण आहे. यामुळेच त्या राजीनामा देऊन बांगलादेश सोडून सुरक्षित स्थळी गेल्याची माहिती मिळत आहे. शेख हसीना यांच्या मुलाने सुरक्षा दलांना आवाहन केलं होतं की, राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर सैन्याने अलर्ट राहावं. त्या पार्श्वभूमीवर ढाक्यासह देशभरात सैन्य तैनात करण्यात आलं होतं. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



बांगलादेशमध्ये का उफाळला हिंसाचार?


बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


मागील अनेक दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणावरुन वादंग सुरु आहे. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे.


बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये ३० टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना ५ टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.

Comments
Add Comment

बलुचिस्तान हादरले! पाक लष्करावर ड्रोन आणि IED हल्ल्यांचा कहर, BLA चा 20 सैनिक ठार केल्याचा खळबळजनक दावा

इस्लामाबाद : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) बलुचिस्तानमध्ये केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये 20 पाकिस्तानी सैनिक

Vietnam Gas Leak : हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये थरकाप उडवणारा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण अडकले

हनोई : व्हिएतनामची राजधानी हनोईतील दाट लोकवस्तीच्या परिसरात मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला असून या दुर्घटनेत

Jensen Huang: एनव्हिडियाचे CEO जेन्सन हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासे; बोर्डासमोर दिलगिरीनंतर पुन्हा पदभार

जगातील आघाडीची टेक कंपनी एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग सध्या त्यांच्या तंत्रज्ञान किंवा एआय चिप्समुळे नाही,

Parastoo Ahmadi 74 lashes: प्रसिद्ध इराणी गायिकेला 74 चाबकाचे फटके, हिजाब न घालता गाणं गायल्यामुळे देण्यात आली शिक्षा

मुंबई: इराणमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महिलांच्या स्वातंत्र्यावरून पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून आला आहे.

ट्रम्प यांची थेट एन्ट्री अन् व्हॅन्सच्या गुप्त बैठका! जेन्सन हुआंग पुन्हा NVIDIA चे CEO, शेअर बाजारात मोठी उसळी?

मुंबई: चिप निर्मिती करणाऱ्या एनव्हीडिया (NVIDIA) या दिग्गज कंपनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय

Nvidia CEO : एनव्हिडियाचे जेन्सन हुआंग पुन्हा CEO पदावर; संचालक मंडळाची एकमताने मंजुरी

जगातील सर्वात मोठ्या एआय चिप कंपन्यांपैकी एक असलेल्या एनव्हीडिया कंपनीचे संस्थापक जेन्सन हुआंग यांनी सीईओ