मुंबई: इराणमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महिलांच्या स्वातंत्र्यावरून पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून आला आहे. हिजाब न घालता गाणं गायल्यामुळे, प्रसिद्ध इराणी गायिका परस्तू अहमदी (Parastoo Ahmadi) हिला 74 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये, बिना हिजाब कॉन्सर्ट केल्याच्या आरोपाखाली गायिका परस्तू अहमदी आणि तिच्या टीममधील चार सदस्यांना प्रत्येकी 74 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. शिवाय या पाचही जणांवर पुढच्या दोन वर्षांसाठी कला आणि संगीत क्षेत्रातील कामकाज आणि परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती, परदेशी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
ट्रम्प यांची थेट एन्ट्री अन् व्हॅन्सच्या गुप्त बैठका! जेन्सन हुआंग पुन्हा NVIDIA चे CEO, शेअर बाजारात मोठी उसळी?
मुंबई: चिप निर्मिती करणाऱ्या एनव्हीडिया (NVIDIA) या दिग्गज कंपनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना अखेर आता पुर्णविराम ...
बचाव पक्षाचे वकील मुस्तफा नीली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ईराणी मानवाधिकारी संघटनेने 'ईरान ह्युमन राईट्स' (IHRNGO) ने त्यांच्या एक्स ह्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन माहिती दिली. वकील मुस्तफा निली यांनी एमतेदादला दिलेल्या माहितीनुसार, परस्तू अहमदीला कोम येथील अभियोक्ता कार्यालयाच्या शिक्षा अंमलबजावणी युनिटमध्ये 74 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. न्यायालयाने गायिकेला आणि तिच्या टीमला म्युझिक कॉन्सर्टदरम्यान, सार्वजनिक सभ्यतेचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरवले होते.
China to Bangladesh ship seized Indonesia : चीनहून बांगलादेशला जाणारे जहाज इंडोनेशियात जप्त; ४०५ टन रसायन आणि लाखो सिम कार्ड्स सापडली
जकार्ता : चीनमधून बांगलादेशकडे निघालेल्या एका मालवाहू जहाजाला इंडोनेशियाच्या नौदलाने पकडले आहे. या जहाजातून तब्बल ४०५ टन 'सोडियम परक्लोरेट' हे खूपच ...
परस्तू अहमदीसह तिच्या कॉन्सर्ट टीममधील चार सदस्यांनाही प्रत्येकी 74 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. यामध्ये आयोजक मोहसीन लश्करी तसेच संगीतकार सोहेल फकीह-नसीरी, अमीन ताहेरी आणि अमीर-अली पिरनिया यांचा समावेश आहे. कोड्यांच्या शिक्षेबरोबरच या पाचही जणांवर पुढच्या दोन वर्षांसाठी कला आणि संगीत क्षेत्रातील कामकाज आणि परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार डिसेंबर 2024 मध्ये यूट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या 'कारवांसेराय कॉन्सर्ट'च्या व्हिडिओशी संबंधित आहे. या व्हिडिओमध्ये परस्तू अहमदी हिजाबशिवाय गाणे गाताना दिसत होती आणि तिच्यासोबत पुरुष संगीतकारही होते. कोमजवळील 'देर-ए-गचीन कारवांसेराय' येथे या कॉन्सर्टचे चित्रीकरण करण्यात आले होते. पर्शियन भाषेत 'कारवांसेराय' म्हणजे प्राचीन काळातील किलेबंद सराय, जिथे पूर्वी प्रवासी आणि व्यापारी थांबत असत.
Viral Ghost Car China: रात्रभर ८६८ वेळा पार्किंगचा प्रयत्न! चीनमधील 'घोस्ट कार'चा व्हिडिओ व्हायरल
रात्री जर तुम्ही तुमची कार बेसमेंटमध्ये पार्क केली आणि वर तुमच्या अपार्टमेंटमध्ये गेलात, आणि तुम्हाला तुमची कार रात्रभर पार्किंगची जागा शोधताना ...
दुसरीकडे, कोम हे शिया समुदायाचे महत्त्वाचे धार्मिक शहर मानले जाते, जिथे अनेक इस्लामी मदरसे आहेत आणि धार्मिक कट्टरतेचे केंद्र म्हणून त्याची ओळख आहे. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलसह विविध मानवाधिकार संघटनांनी या शारीरिक शिक्षेचा निषेध करत ती अमानवीय असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, इराणच्या न्यायव्यवस्थेने आणि प्रशासनाने देशातील कायदे आणि धार्मिक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याची भूमिका कायम ठेवली आहे. या शिक्षेमुळे इराणमधील कलाकारांवर येणाऱ्या निर्बंधांची तीव्रता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.