१७ महिन्यानंतर 'आप' नेते मनीष सिसोदिया तुरूंगातून बाहेर

नवी दिल्ली: दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तिहार तुरूंगातून बाहेर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आबकारी धोरण प्रकरणात कथिळ घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन दिला.


आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या वकिलांनी दिल्लीतील न्यायालयात जामिनाचा बाँड भरला आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ते गेल्या १७ महिन्यांपासून तिहार तुरुंगात होते.


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती के वी विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले की सिसोदिया १७ महिन्यांपासून ताब्यात आहे आणि आतापर्यंत या प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली नाही यामुळे ते लवकर सुनावणीच्या अधिकारापासून वंचित झाले. खंडपीठाने हे ही म्हटले की या प्रकरणात मनीष सिसोदिया यांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात पाठवणे योग्य ठरणार नाही. यावेळी खंडपीठाने सिसोदिया यांना १० लाख रूपयांच्या जातमुचलक्यावरआणि त्याच रकमेच्या दोन जामीनावर सोडण्याचे आदेश दिले.


दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी २०२३मध्ये अटक केली होती. उत्पादन शुल्क धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यानंतर ही पॉलिसी रद्द करण्यात आली होती. ईडीने त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ९ मार्च २०२३ला अटक केली होती.

Comments
Add Comment

Amit Shah : पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट : भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र; अमित शहा-सुखबीर बादल यांच्या पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा

चंदीगड : पंजाबच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी

Explainer: पश्चिम बंगालच्या नामांतराची चर्चा, राज्याचं नाव बदलण्याची घटनात्मक प्रक्रिया काय?; वाचा A टू Z माहिती

मुंबई: 2001 मध्ये कलकत्त्याचे नाव बदलून कोलकाता केल्यानंतर आता, पंचवीस वर्षांनंतर 'पश्चिम बंगाल' राज्याचे नाव

Notice to Sonia Gandhi: स्वा. सावरकरांचे नातू सत्याकी यांच्याकडून सोनिया गांधींना नोटीस; १५ दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीचा दावा

मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या

Sheikh Hasina : बांगलादेशात परतण्यासाठी शेख हसीनांनी ठरवली तारीख ! 16 डिसेंबरला मायदेशी परतण्याची इच्छा

Sheikh Hasina : बांगलादेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारतात वास्तव्यास

Gold Spot Is Back: 90 च्या दशकातील लोकप्रिय शीतपेय पुन्हा येणार! जुन्या आठवणींना मिळणार उजाळा

90 च्या दशकातील अनेकांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेले लोकप्रिय शीतपेय म्हणजे 'गोल्ड स्पॉट'. एकेकाळी लहान

School Bus Accident: आनंदाच्या सहलीचा दुःखद शेवट! स्कूल बस आणि ट्रक अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर मंगळवारी (24 नोव्हेंबर) सकाळी भीषण रस्ते अपघात घडला.