Manoj Jarange Patil : आज पुण्यात मनोज जरांगेंची शांतता रॅली! अनेक रस्ते बंद

'हे' असतील पर्यायी मार्ग


पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज पुणे शहरात शांतता रॅली (Shantata Rally) निघणार आहे. सोलापूर आणि सांगलीनंतर आज ही फेरी पुण्यात दाखल होणार आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. दरम्यान या रॅलीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर सकाळी अकरा वाजता शांतता फेरीला सुरुवात होणार आहे. ही शांतता रॅली टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल मार्गावरून जाणार आहे. पुढे ही रॅली एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता मार्ग डेक्कन जिमखाना भागातील पोहचणार आहे. छत्रपती संभाजी पुतळा येथे रॅलीची सांगता होणार आहे.


यापार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. अनेक रस्त्यांवरील वाहतूक रॅलीदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिले आहेत. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.



वाहतुकीसाठी कोणते रस्ते बंद ?


एस पी कॉलेज चौक ते पूरम चौक, जेधे चौक, कुमठेकर मार्गावरील शनिपार चौक, लक्ष्मी मार्गावरील बेलबाग चौक, अप्पा बळवंत चौक, मंगला टॉकीज प्रिमिअर गॅरेज मार्ग, शिवाजीनगर न्यायालय, भिडे पूल पुलाची वाडी ते जंगली महाराज रोड आणि खंडोजीबाबा चौक या ठिकाणी वाहतुकीसाठी रस्ते बंद असणार आहेत.



वाहतूक वळवण्यात येणारे प्रमुख चौक



  • नवले पूल - वाहतुकीचा आढावा घेऊन नवले पुलाकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्याकडे वळविण्यात येईल.

  • कोंढवा खडीमशीन चौक - जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटमार्गे जातील.

  • कात्रज चौकमार्गे फेरी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे जाणार आहे.

  • फेरी मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील वाहतूक पुन्हा खुली करून देण्यात येणार आहे.


या पर्यायी मार्गांचा करा वापर



  • छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, राष्ट्रभूषण चौकमार्गे जाणारी वाहने शंकरशेठ रस्त्याने जातील. तर शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौक ते जेधे चौक भागातून जाणाऱ्या वाहनांनी मार्केट यार्ड किंवा नेहरू रस्त्याने जावे.

  • मार्केट यार्ड ते जेधे चौक भागातील वाहनांनी शिवनेरी रस्त्याने वखार महामंडळ चौकातून इच्छितस्थळी जावे.

  • पंचमी हॉटेल, शिवदर्शन चौक, गजानन महाराज मंदिरमार्गे वाहनचालकांनी पर्वती गावातून जावे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा