मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात आयोगातीलच सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. नाकते याने परीक्षेच्या प्रश्नसंचातून सुमारे 300 प्रश्न स्वतःच्या लॅपटॉपवर टंकलिखित करून त्यांच्या प्रती काढल्या आणि आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयातील वाहनतळावर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सुपूर्द केल्या, असा धक्कादायक तपशील पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रातून समोर आला आहे.
Nashik : पंचवटी एक्सप्रेसखाली येऊन मामा-भाचा गंभीर जखमी, मामाच्या हाताची चार बोटे तुटली तर भाच्यानं पाय गमावला
नाशिक : रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात पंचवटी ...
पेपरफुटी उघड झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचे संरक्षण मिळावे, या हेतूने नाकते याने अवर सचिव अभिजित लेंडवे यालाही कटात सहभागी करून घेतल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल या प्रकरणात शुक्रवारी विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभाग न्यायालयात तीन हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणाचा उलगडा होण्यामागे उमेदवार ऋतुजा पाटील आणि तिचा प्रियकर लोकेश ऊर्फ गौरव पाटील यांच्यातील बिघडलेले संबंध कारणीभूत ठरल्याचे आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे. ऑगस्टमध्ये पहिली अटक झाल्यानंतर पोलिसांनी गौरवला या प्रकरणातील माहिती उघड करणारा (व्हिसलब्लोअर) ठरवले होते. ऋतुजाला परीक्षेपूर्वीच प्रश्न मिळवून देण्यात त्याची भूमिका असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
Nashik : नाशिकमध्ये FDA ची धडक कारवाई ! तीन आस्थापनांचे परवाने निलंबित
नाशिक : शहरातील हॉटेल आणि अन्न आस्थापनांमधील स्वच्छता तसेच अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा ...
ऋतुजाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तिच्या पालकांचा गौरवसोबतच्या नात्याला विरोध होता. तिने गौरवला सोडले नाही, तर आत्महत्या करू, अशी धमकी पालकांनी दिल्याने तिने परीक्षेनंतर त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यातून दोघांचे संबंध संपुष्टात आले. याचा राग आल्याने गौरवने एमपीएससीला ईमेल पाठवून ऋतुजाकडे परीक्षेपूर्वीच प्रश्न असल्याचा आरोप केला, असे तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. ऋतुजाला गौरवशी लग्न करायचे होते; मात्र पालकांच्या दबावामुळे तिने संवाद थांबवला आणि त्यातून संतप्त झालेल्या गौरवने ही माहिती सार्वजनिक केली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
26 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या पहिल्या सहा आरोपींचा या आरोपपत्रात समावेश आहे. त्यापैकी तीन आरोपी एमपीएससीचे अधिकारी आहेत. नाकते याच्याकडे आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयातील प्रश्नपत्रिकेच्या ‘मेटा सेट’ची जबाबदारी होती. याच मुख्य प्रश्नसंचातून अंतिम प्रश्नपत्रिका तयार केली जाते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
Nashik : पंचवटीत खोदकामादरम्यान पुरातन मंदिरांचा शोध ! नंदी, शिवलिंगासह मंदिरांचे अवशेष आढळले
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात सुरू असलेल्या रामकाल पथ विकासकामादरम्यान एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शोध समोर आला ...
आरोपी सध्या काय करतात?
विश्वेश्वर नाकते, अवर सचिव अभिजित लेंडवे आणि गोपाळ मराठे या आयोगातील अधिकाऱ्यांसह मध्यस्थ प्रवीण पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि प्रियकर गौरव पाटील यांची नावे पहिल्या आरोपपत्रात आहेत. ऋतुजाला सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. एकूण १३ अटक आरोपी आणि दोन फरार आरोपींचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींविरोधात डिसेंबरमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. सर्व अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.