बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची २४ फेब्रुवारीपासून

दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा प्रथमच दोन्ही परीक्षा नियोजित तारखेपेक्षा ८ ते १० दिवस अगोदर होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते दि. १८ मार्च २०२५ या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.


विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने राज्य मंडळाकडून दरवर्षी परीक्षेच्या तारखा ५ ते ६ महिने अगोदर जाहीर केल्या जातात. त्यानुसार फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये आयोजित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया वेळेत होण्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तयारीला विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी यंदापासून दोन्ही परीक्षा ८-१० दिवस लवकर होत आहेत. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. २४ जानेवारी ते दि. १० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.


दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षेचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. या संभाव्य वेळापत्रकावर सूचना, हरकती मांडण्यासाठी दि. २३ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर या सूचना पाठवायच्या आहेत. निर्धारित वेळेनंतर येणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नाहीत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Comments
Add Comment

Godavari Pollution: गोदावरी प्रदूषणप्रकरणी 199 अधिकारी न्यायालयाच्या रडारवर

मुंबई : गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात 199 अधिकाऱ्यांची

MPSC पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार आयोगातीलच अधिकारी, 300 प्रश्न लॅपटॉपवर टाईप केल्याचा आरोप; सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात आयोगातीलच

जळगावातील स्मशानभूमीत अघोरीचा थरार! चितेजवळ नारळ, लिंबू, अंडे अन्... सीसीटीव्हीतील प्रकार पाहून नातेवाईकांचा संताप

जळगाव: जळगाव शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नेरी नाका स्मशानभूमीमध्ये

Maharashtra Weather Upadates: राज्यात थंडीचा जोर वाढणार! विदर्भातील 'या' तीन जिल्ह्यांत गारठा वाढण्याचा अंदाज

नोव्हेंबर महिना संपत आला असून राज्यातील हवामानात हळूहळू बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Prahaar Marathi News Live 24 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 24 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

दुष्काळी भागात ताकदीने काम करा; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नगराध्यक्षांना निर्देश

राज्यातील दुष्काळाची दाहकता पाहता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जोमाने काम करा, असे निर्देश