गणेशोत्सवासाठी दिलासा; मांडवा-गेटवे जलवाहतूक १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

मुंबई : मांडवा ते मुंबई (गेटवे ऑफ इंडिया) दरम्यानची फेरी सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. मान्सून काळात खवळलेल्या समुद्रामुळे ही सेवा २६ मेपासून बंद करण्यात आली होती. या सेवेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


प्रत्येक वर्षी पावसाळ्यात समुद्रातील अनिश्चित स्थितीमुळे ही जलवाहतूक सेवा बंद ठेवावी लागते. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतरच महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतो. मांडवा ते गेटवे या मार्गावर पीएनपी, मालदार, अजंठा आणि अपोलो या कंपन्यांच्या फेरीबोटी चालतात. या जलमार्गावर दरवर्षी सुमारे १५ लाख प्रवासी प्रवास करतात.


फेरीबोटींच्या दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी आवश्यक तपासण्या पूर्ण करूनच या सेवा सुरू करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याने या सेवेमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास अधिक सोयीचा होईल. त्याचबरोबर पर्यटकांची संख्या वाढून अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांवरही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.


मांडवा ते गेटवे ऑफ मुंबई हा मार्ग विशेषतः मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी खुला करण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना जलमार्गातून आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा लाभ घेता येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या सेवेला सुरुवात होणार असल्याने कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होईल.

Comments
Add Comment

FDA Mumbai: मुंबईत अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; विद्यापीठ कॅन्टीनसह 6 आस्थापनांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई

Mumbai Water Cut : मुंबईत 26 आणि 27 नोव्हेंबरला 24 तास पाणीकपात; धारावी, वांद्रे पूर्वसह अनेक भागांवर परिणाम

मुंबई : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. बृहन्मुंबई

Mumbai Book Festival 2026 : मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य

मुंबई : मुंबईकरांसाठी पुस्तकप्रेमाचा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (NBT-India)

Devendra Fadnavis : एनटीएच्या परीक्षा आयोजनात राज्य शासनाचा सहभाग वाढवण्यावर भर; उच्चस्तरीय समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा

मुंबई : राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आयोजित करत असलेल्या विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक

गवळी, गोल्लार, वडार आणि चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; हिवाळी अधिवेशनात मार्ग काढणार

मुंबई: विधान भवन येथे सोमवारी राज्यातील विविध समाजांचे प्रश्न आणि प्रलंबित मागण्या जाणून घेण्यासाठी विधान

NSEL Investors Relief: 'एनएसईएल' गैरव्यवहारात पैसे अडकलेल्या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना मिळणार परतावा

मुंबई : राष्ट्रीय स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या 13 वर्षांपासून