गवळी, गोल्लार, वडार आणि चर्मकार समाजाच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; हिवाळी अधिवेशनात मार्ग काढणार

विधान भवन येथे सोमवारी राज्यातील विविध समाजांचे प्रश्न आणि प्रलंबित मागण्या जाणून घेण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली.

मुंबई: विधान भवन येथे सोमवारी राज्यातील विविध समाजांचे प्रश्न आणि प्रलंबित मागण्या जाणून घेण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत गवळी, गोल्लार, वडार, रोहिदास (चर्मकार) आणि हिंदू ढोर-कक्कया समाजाच्या शिष्टमंडळांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच त्या मागण्या सकारात्मक पद्धतीने नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.






या सर्व मागण्यांवर आगामी नागपूर हिवाळी अधिवेशन कालावधीत सकारात्मक चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन उपसभापती सचिन अहिर यांनी यावेळी दिले. मेळघाटसारख्या दुर्गम भागातील गवळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारणे व शासकीय सुविधा पुरवणे. तसेच, 'श्री कृष्ण आर्थिक विकास महामंडळा'च्या व्याप्तीमध्ये महाराष्ट्रातील गवळी समाजाच्या सर्व उपशाखा आणि तत्सम जातींचा (उदा. यादव, अहिर गवळी, नंद गवळी, मराठी गवळी, गोल्ला, गोल्लेवार, गोल्लेरु, गोलकर, दाभोली गवळी, तमिळ व तेलंग यादव, तसेच मुंबई-ठाणे व राज्यातील हिंदी भाषिक उत्तर भारतीय ग्वाल, अहीर, यादव) समावेश करणे.


समाजप्रबोधन आणि समतेचा संदेश देणारे संत शिरोमणी वीरशैव कक्कय्या महाराज यांना केंद्र व राज्य शासनाने 'राष्ट्रीय संत' म्हणून घोषित करावे व त्यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करावी. तसेच, या समाजाला सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, यांसारख्या मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या.
तसेच गोल्लार, वडार आणि रोहिदास (चर्मकार) समाजाच्या प्रतिनिधींनीही आपापल्या समाजाच्या विकासासाठी आणि प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी या बैठकीत सविस्तर मुद्दे मांडले. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी व विविध समाजांचे प्रमुख प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

NSEL Investors Relief: 'एनएसईएल' गैरव्यवहारात पैसे अडकलेल्या 5 हजार 682 गुंतवणूकदारांना मिळणार परतावा

मुंबई : राष्ट्रीय स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या 13 वर्षांपासून

Powai Lake : पवई तलावावर 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पाहता येणार

मुंबई : मुंबईतील पवई तलावाच्या सौंदर्यात आता अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे. 180 मीटर लांबीच्या या

Mumbai Police : मुंंबई पोलिसांना मिळणार OR कोड असलेले स्मार्ट ओळखपत्र

Mumbai News: पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना आळा घालण्यासाठी मुंबई

Mercedes Benz India: मुंबईत क्लासिक कार रॅलीचा जल्लोष! नेहरूंची ऐतिहासिक मर्सिडीज पाहून प्रताप सरनाईकही भारावले

मुंबई: मर्सिडीज-बेंझ इंडिया आणि ऑटोकार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026’चा

Mumbai Water: मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी BMCचा नवा प्लॅन, भांडुपमध्ये 2 हजार MLD क्षमतेचे नवे जलशुद्धीकरण केंद्र

मुंबई: मुंबई शहराचा पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू राहण्‍यासाठी भांडुप संकुल येथे 2 हजार दशलक्ष लीटर (MLD) प्रतिदिन

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध