मेट्रो १ मार्गिकेवरून १०० कोटींहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

मुंबई : ‘वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने १३ ऑगस्ट रोजी पाच लाखांचा टप्पा पार केला. गेल्या १० वर्षांमध्ये ‘मेट्रो १’ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांची संख्या १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे.


मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असलेली ‘मेट्रो १’ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. या मेट्रो मार्गिकेला सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. या मार्गिकेची मालकी, देखभाल–संचलनाची जबाबदारी असलेल्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) प्रवाशांचा प्रसिसाद वाढावा यासाठी विविध प्रयत्न केले. अनेक सुविधा विकसित केल्या. ‘दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर-गुंदवली मेट्रो ७’ मार्गिका सेवेत दाखल झाल्या. या मार्गिका ‘मेट्रो १’शी जोडण्यात आल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून मागील काही महिन्यांपूर्वी प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच आता ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या साडेचार लाख ते पावणेपाच लाखांच्या घरात पोहोचली. १३ ऑगस्ट रोजी दैनंदिन प्रवाशी संख्येने ५ लाखांचा टप्पा पार केला. ‘मेट्रो १’मधून १३ ऑगस्ट रोजी पाच लाख ३८५ प्रवाशांनी प्रवास केला. ही आतापर्यंतची दुसरी दैनंदिन विक्रमी प्रवासी संख्या होती.


‘मेट्रो १’ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या वाढत असून आता या मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवासी संख्येतही वाढ होण्यास मदत झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘मेट्रो १’ मार्गिका सेवेत दाखल होऊन १० वर्षे पूर्ण होत असताना या मार्गिकेवरील एकूण प्रवासी संख्येने ९७ कोटींचा टप्पा गाठला होता. आता अडीच महिन्यांतच एकूण प्रवासी संख्येने १०० कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आली.

Comments
Add Comment

MPSC Protest : MPSC आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका; विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे-विक्रम पाचपुते

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत भाजपा आमदार विक्रम

Mumbai Ganeshotsav : वाडी बंदरच्या महाराजांचे भव्य रूप; बारा ज्योतिर्लिंगांची सजावट ठरतेय यंदाचे खास आकर्षण

मुंबई : मुंबईतील वाडी बंदर परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने विराजमान होणारे वाडी बंदरचे महाराज

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करा!

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई :

Mumbai Accident : कुलाब्यात दोन दुचाकींची जोरदार धडक; अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात दोन दुचाकींची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू

Diabetes Free Mumbai : भाजपच्या ‘मधुमेहमुक्त मुंबई' अभियानाचा विक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; एकाच दिवशी २८७ आरोग्य शिबिरांमध्ये ७९ हजार ३०६

BMC News : फेरीवाल्यांवरील कारवाईत महापालिका व पोलिसांत समन्वयाचा अभाव!

विधी समितीच्या बैठकीत सदस्यांनी व्यक्त केली नाराज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस