Ranveer Singh Deepika Padukone : दीपिका-रणवीर बाळाच्या जन्मानंतर ११९ कोटींच्या घरात करणार जंगी एंट्री

मुंबई : बॉलीवूडमधलं सर्वात प्रसिद्ध कपल म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग... अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे दोघे लवकरच आई-बाबा होणार आहे. दोघांच्या घरी लवकरच छोट्या गोंडस बाळाचं आगमन होणार आहे. त्याआधी या दोघांकडून खास तयारी केली जात आहे. या दोघांच्या १०० कोटींहून अधिक किंमतीच्या नव्या घराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या इमारतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही इमारत शाहरुख खानच्या घर 'मन्नत'च्या अगदी जवळ आहे. हा भाग मुंबईतील सर्वात महागडा आणि पॉश म्हणून ओळखला जातो.


दीपिका आणि रणवीरने दोन वर्षांपूर्वी या इमारतीत एक अपार्टमेंट बुक केलंहोतं. तेव्हापासून घराचे काम सुरू होते. आता, दीपिका-रणवीर या सप्टेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. त्यामुळे हे दोघेही बाळासोबत नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा प्रचंड सुरू झाली आहे.


दीपिका-रणवीरने मुंबईतील वांद्रे भागात अलिशान घर खरेदी केले आहे. ही इमारत किंग खानच्या 'मन्नत' या बंगल्याच्या मागच्या बाजूस आहे. हे प्राइम लोकेशन असून या ठिकाणाहून समुद्राचे नयनरम्य दृष्य अगदी सुंदर दिसते. मागच्या दोन वर्षांपासूनया इमारतीचे बांधकाम सुरू आहे.


पापाराजी विरल भयानी यांनी या बिल्डिंगचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स येत आहे. ही सगळी इमारत दीपिका-रणवीर यांची आहे का, असा प्रश्नसुद्धा नेटकऱ्यांनी विचारला आहे. एकाने म्हटले की फक्त ३ लोकांसाठी ही सगळी बिल्डिंग? आता, दीपवीरचे शेजारी शाहरुख असणार असल्याचेही एका नेटकऱ्याने म्हटलंय.



रणवीर-दीपिकाने खरेदी केलं इमारतीचे चार मजले


या घरासाठी रणवीर-दीपिका यांनी ११९ कोटी मोजले असल्याची माहिती समोर आल्यानंतर मोठी चर्चा झाली आहे. घर खरेदी करणं सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक व्यवहार समजला जातो. रणवीर-दीपिका यांनी १६, १७,१८ आणि १९ मजले खरेदी केले आहे. या अपार्टमेंटमध्ये एकूण ११,२६६ चौफूट चटईक्षेत्र आहे. त्यासोबतच १३०० चौफूटचा एक्सक्लूसिव्ह टेरेस देखील दिला आहे. इमारतीमध्ये १९ पार्किंग स्पेससुद्धा उपलब्ध आहे.



फ्लॅट्समध्ये आहेत खास सुविधा...


अपार्टमेंटसाठी दीपवीरने ११८.९४ कोटी रुपये मोजले आहेत. अशातच दोघांनी नोंदणीसाठी ७.१३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. यामुळे टेरेस क्षेत्र वगळून प्रति चौरस फूट दर हा १.०५ लाख रुपये इतका होतो. या अपार्टमेंटमध्ये सुविधाही खूप खास आहेत. एक वैयक्तिक जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट स्पेस देखील आहे. या दोघांच्या प्रोफेशनल लाइफला लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या