लोकसभा पराभवानंतर विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर

जम्बो टीम तयार, नितीन गडकरींकडे महत्त्वाची जबाबदारी; फडणवीस, बावनकुळे, दानवेंकडेही विशेष मोहीम



चार जणांकडे प्रचाराचे नेतृत्व; १७ स्टार प्रचारकांची यादी तयार


मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपाने रणनीती आखण्यासाठी सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जम्बो टीम तयार केली आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विशेष स्थान देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या गडकरींकडे विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.


लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर भाजपाने विधानसभेसाठी चार जणांकडे प्रचाराचे नेतृत्त्व दिले आहे. नितीन गडकरींकडे विशेष प्रचारकपद देण्यात आले आहे. ते महिनाभर राज्य पालथे घालतील. विविध भागांत जाऊन पक्षाचा प्रचार करतील. निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक प्रमुखपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची निवड करण्यात आली आहे. या दोघांशिवाय प्रचाराचे नेतृत्त्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे असेल. गडकरी, फडणवीस, दानवे, बावनकुळे या चार नेत्यांकडे भाजपाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.



स्टार प्रचारकांमध्ये राजकीय रथी-महारथींचा समावेश


भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. त्यात १७ जणांचा समावेश आहे. यातील काही जण काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत खासदार अशोक चव्हाण, खासदार नारायण राणे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन महाजन, रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रविण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.



विदर्भातील ६२ जागांवर भाजपाचे विशेष लक्ष


प्रचाराचे नेतृत्त्व चौघांकडे सोपवणाऱ्या भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीत १७ जणांना स्थान दिले आहे. एकूण २१ नेत्यांवर भाजपाने विधानसभेसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाड्यात बसला. विदर्भातील लोकसभेच्या १० पैकी केवळ २ जागा भाजपला जिंकता आल्या. फडणवीस, गडकरी, बावनकुळे विदर्भातून येतात. तिथे विधानसभेच्या ६२ जागा येतात. त्यामुळे भाजपाने विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. विदर्भासाठी मध्य प्रदेशमधील ४ नेत्यांना सक्रिय करण्यात आले आहे. लोकसभेला मध्य प्रदेशात भाजपला २९ पैकी २९ पैकी जागा मिळवून देणाऱ्या चार नेत्यांकडे भाजपाने विदर्भाची जबाबदारी दिली आहे.

Comments
Add Comment

तरुणांसाठी आनंदाची बातमी! नोकरी आणि स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी; कसं करायचा अर्ज...

मुंबई: आजच्या धावपळीच्या आणि सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी असणे पुरेसे राहिलेले नाही, तर हातात

Jejuri Morgao Road Accident: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर काळाचा घाला! शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; नाझरे परिसरात शोककळा

पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर सोमवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. शिवाई बस आणि दुचाकी

Air Ambulance Service: प्रताप सरनाईक यांचा महत्त्वाचा निर्णय; एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी समिती स्थापन

मुंबई: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या

अहिल्यानगर शहरात भाजपकडून 'लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव' महारॅलीचे आयोजन, पदयात्रेमध्ये हजारो नागरिक यात्रेत सहभागी

अहिल्यानगर: लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव महारॅली हे कोणतेही शक्तीप्रदर्शन नाही. लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण बस अपघात; 2 प्रवाशांचा मृत्यू, 30 जण जखमी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक 426 येथे रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला.

भूजलाचा ठणाणा; दुष्काळाचे संकट अधिक गडद, गर तालुक्यात सर्वाधिक 4.87 मीटरची घसरण

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : पावसाने पाठ फिरवली, जलसाठे आटू लागले आणि आता जमिनीच्या पोटातील पाण्यानेही तळ गाठण्यास