बाप्पा आला रे...

हलकं-फुलकं - राजश्री वटे


किती जिव्हाळ्याचा आतून आलेला आवाज...
कारण.... तो येणार असतो ना... गोंडस, गोजिरवाणा, लोभस, लडीवाळ, बाळसेदार, गुटगुटीत...
बाप्पा मोरया रे... तो येण्याच्या किती तरी दिवस आधी ही ओळ ओठांवर गुणगुणते!!
किती तरी दिवस त्याच्या आगमनाची तयारी घराघरांत, मंडळा-मंडळात उत्साहाने सुरू होते... हे करू का... ते करू, असं करू कां तसं करू.... नुसतं उधाण आलं असतं... मनाला व कामाला!!
मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराचे हात सुद्धा माती कुरवाळत तुझं सुंदर रूप साकारतात!!
नवीन नवीन आरास डोक्यात धुमाकूळ घालत असते... काय छान दिसेल... कसं छान दिसेल!!
प्रसादाचे मोदक नैवेद्याच्या आधीच जिभेवर उड्या मारायला लागतात व या आठवणीने पोटात कावळ्यांचा दंगा चालू होतो... कधी एकदाच...😋😋

घरदार घासून पुसून स्वच्छ होऊन तोरणासाठी सज्ज, अंगण सारवून बसतं रांगोळीची वाट पहात
कधी ती येते सजून रंगून!!
चौरंग सुद्धा चकचकीत होतो त्या गुटगुटीत बाळाला मांडीत बसवायला!
किती किती तयारी त्या लडीवाळाची, त्याच्या मुक्कामात कशाची कमी पडायला नको याची पूर्ण काळजी घेतली जाते, आईला सोडून दहा दिवस ते आपल्या कडे राहणार असतं ना... बुद्धीची देवता ती... प्रत्येकाची झोळी त्याच्यापुढे पसरलेली!

पावसाने न्हाऊन माखून झालेली फुले त्याच्या गळ्यात विराजमान व्हायला तयार, तर दुर्वा पण फुलांचा हात धरून हजर!
दोन समया चौरंगाच्या दोन बाजूला मंद वाती तेवत झोकात उभ्या!
झालं... झालं... सगळं झालं... आता फक्त आगमन.....
ढोल, ताशे, टाळ... आसमंत दुमदुमुन गेला... मनातला व जगातला!!
आला रे... जल्लोष... बाप्पा मोरया रे...
डोळे दीपले त्याला पाहून.... वर्षातून एकदाच येतोस रे... पण जीव सुखावून जातो... किती करू न किती नको असं होऊन जातं रे तुझ्यासाठी!

कसं आहे न्... देवाचं अन् आपलं नातं... खूप जवळचं... आई इतकंच... म्हणून देवाशी संवाद करताना नेहमी एकेरीच संबोधतो आपण... इतकं एकरूप! त्यालाही ते आवडत असतं असं जीवाभावाचं नातं जुळणं भक्ताशी...!
तो आला... तो बसला..... मोदकाचा आस्वादही घेतला...
मन आनंंदाने नाचू लागलं...
बाप्पा मोरया रे!!! नमो नमो गणराया
तू सदा सिद्धीचा पाया
मंगलमूर्ती अगाध कीर्ती
बाप्पा मोरया रे... बाप्पा मोरया रे...
गणपती बाप्पा मोरया...
Comments
Add Comment

हिमालयाचा इशारा

भास्कर खंडागळे नेपाळचा महाप्रलय हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा आणि हवामानबदलाच्या वाढत्या परिणामांचा इशारा

योग्यवेळी परतफेड

अनिल रा. तोरणे आयुष्यात मिळालेल्या सहकार्याची जाणीव ठेवणारी माणसे योग्य वेळी त्याची परतफेड करतात. राकेश रोशन

आव्हानांना सामोरं जाण्याचा माईंडसेट

डॉ. स्वाती गानू दहावी किंवा बारावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न येतो - “हे सगळं

'देव जरी मज कधी भेटला...'

श्रीनिवास बेलसरे ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना

भाषासक्तीने भाषाप्रेम वाढेल, की भाषाभेद ?

निशा वर्तक भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती व्यक्तीच्या अस्मितेची आणि संस्कृतीची प्रतीक असते. भारतासारख्या

मंगलतीर्थ

भालचंद्र ठोंबरे निमिषारण्यात जमलेल्या अनेक ऋषीमुनींना सुतांनी अनेक तीर्थक्षेत्रांची माहिती व महत्त्व