Crime : धक्कादायक! जन्मदात्रीच्या चुकीमुळे गेला चिमुकल्याचा जीव

बाळाची आई मद्यधुंद असताना रात्री बाळ दूध पिताना झाले काही असे...


अमरावती : धामणदस गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्रीच्या चुकीमुळे तिच्या पोटच्या मुलाचा जीव गेला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.



नेमके प्रकरण काय?


एका २५ वर्षीय महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पहिलेच बाळंतपण असल्याने ती प्रसूतीनंतर बाळासह माहेरी धामणदस येथे होती. दरम्यान, ६ सप्टेंबरला रात्री ती बाळाला घेऊन खाटेवर झोपली. तिने मद्यपान केले होते. रात्रीच्या सुमारास दूध पिताना ते बाळ आईच्या अंगाखाली दबले. यात बाळाचा श्वास गुदमरला आणि बाळाचा मृत्यू झाला.


बाळाची आई मद्यधुंद असल्यामुळे आपल्याच पोटचा गोळा अंगाखाली आला हे तिला सकाळपर्यंत लक्षात आले नाही. सकाळी बाळ रडत नव्हते. त्यामुळे बाळ दगावल्याचे कुटुंबीयांना समजले. त्यानंतर तत्काळ ही माहिती बेनोडा पोलिसांना देण्यात आली.


दरम्यान, बाळाच्या शरीरावर कोणतेही व्रण नव्हते. मात्र, तोंडातून दूध बाहेर आले होते व नाकातून रक्तस्त्राव झाला होता. पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी पाठवला. अहवालात बाळाचा मृत्यू श्वास गुदमरल्यानेच झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बाळाच्या आईचीसुद्धा वैद्यकीय तपासणी केली. ती झोपली होती तिथे तिने ओकारी केल्याचे दिसत होते. दारूचा वास येत होता. यामुळे ती घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत होती हे समोर आले. बाळाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गुन्हा आईविरुद्ध दाखल केला असल्याची माहिती ठाणेदार तथा सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी दिली.

Comments
Add Comment

Air Ambulance Service: प्रताप सरनाईक यांचा महत्त्वाचा निर्णय; एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी समिती स्थापन

मुंबई: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या

अहिल्यानगर शहरात भाजपकडून 'लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव' महारॅलीचे आयोजन, पदयात्रेमध्ये हजारो नागरिक यात्रेत सहभागी

अहिल्यानगर: लोकतंत्र बचाव भीडतंत्र हटाव महारॅली हे कोणतेही शक्तीप्रदर्शन नाही. लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण बस अपघात; 2 प्रवाशांचा मृत्यू, 30 जण जखमी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक 426 येथे रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला.

भूजलाचा ठणाणा; दुष्काळाचे संकट अधिक गडद, गर तालुक्यात सर्वाधिक 4.87 मीटरची घसरण

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : पावसाने पाठ फिरवली, जलसाठे आटू लागले आणि आता जमिनीच्या पोटातील पाण्यानेही तळ गाठण्यास

Bhandara Hit And Run Case: भंडाऱ्यात हिट अँड रनचा थरार; भरधाव वाहनाच्या धडकेत सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, वाहनचालक पसार

भंडारा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील तामसवाडी येथे हिट अँड रनची घटना घडली असून भरधाव

'अति घाई संकटात नेई' व्हिडिओ कॉलवर बोलताना प्रवाशाचे भलतेच धाडस, 24 वर्षीय प्रवाशाचा पोलिसांनी 'असा' वाचवला जीव!

मुंबई: रेल्वेने प्रवास करत असताना कायमच सांगितलं जातं की, प्रवास करताना फोनवर बोलू नका. वारंवार सुचना दिल्या जात