मुंबई: रेल्वेने प्रवास करत असताना कायमच सांगितलं जातं की, प्रवास करताना फोनवर बोलू नका. वारंवार सुचना दिल्या जात असतानाही एका प्रवाशाला रेल्वेतून उतरताना नियम धाब्यावर बसवणं, चांगलच अंगलट आलं आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे. गोंदियाहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमधून उतरताना एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. अकोला रेल्वे स्थानकावर चालत्या विदर्भ एक्सप्रेसमधून उतरत असताना व्हिडिओ कॉलवर बोलत असताना एका 24 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. उतरत असताना ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत पडलेल्या या तरुणाला रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे नवं आयुष्य मिळालं.
'अति घाई संकटात नेई' या म्हणीचा प्रत्यय काल अकोला रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला. स्वत:ची एक छोटी चूक व्यक्तीला त्याच्या जीवावर बेतली असती. गोंदियाहून मुंबईच्या दिशेने जाणारी 12106 अप गोंदिया- मुंबई सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस रात्री साडेनऊच्या सुमारास अकोला स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दाखल होत होती. गाडी पूर्णपणे थांबण्याआधीच एक्स्प्रेसमधून खाली उतरणं, एका 24 वर्षीय प्रवाशाला चांगलंच महागात पडलं. त्यामध्ये तो व्हिडिओ कॉलवर बोलत रेल्वेमधून उतरत होता. प्रवाशाला त्याचा निष्काळजीपणा चांगलाच अंगलट आला. परंतू आरपीएफ पोलिसांच्या सावधानतेमुळे तरुण प्रवाशाचा जीव थोडक्यात बचावला आहे.
Navi Mumbai Fire: नवी मुंबईमध्ये ऑईल कंपनीला भीषण आग, आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट
नवी मुंबई: नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 18 मधील एका तेल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी रात्री घडली. मॅफ्को मार्केटच्या मागच्या बाजूला असणाऱ्या ...
मिळालेल्या माहितीनुसार, भानू प्रसाद अंगत प्रसाद लोधी असं या प्रवाशाचं नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील चारगाव येथील रहिवासी आहे. मजुरीचं काम करणारा भानू हातात बॅग घेऊन आणि मोबाईलवर व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच, गाडीचा वेग कमी होण्यापूर्वीच विरुद्ध दिशेने प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करत होता. धावत्या एक्स्प्रेसमधून उतरण्याच्या नादात भानूचा तोल गेला आणि तो थेट प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या फुटबोर्डमधील जीवघेण्या फटीत अडकला. अवघ्या काही क्षणांचा उशीर झाला असता तर तो थेट रेल्वेच्या चाकाखालीच गेला असता. परंतू रेल्वे पोलिसांच्या सावधानतेमुळे प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला. दरम्यान, रेल्वे पोलिसांच्या ह्या कृतीमुळे पुन्हा एकदा प्रवाशांकडून आणि नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
मात्र, त्याच वेळी ऑन ड्युटी असणाऱ्या असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) राजेश नागरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत भानूला घट्ट पकडलं आणि गाडीच्या चाकाखाली जाण्यापूर्वीच सुरक्षितपणे बाहेर ओढलं. त्यांच्या मदतीला महिला हेड कॉन्स्टेबल दुर्गा रामटेके आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण हे देखील तत्परतेने धावले. पोलिसांच्या या समयसूचकतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि एका निष्पाप तरुणाचा जीव वाचला. भानू हा विदर्भ एक्सप्रेसने अकोल्यात पोहोचला होता. त्याला पुढे लातूरला जायचं होतं आणि त्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर काकीनाडा-कर्नूल टाउन एक्सप्रेस उभी होती. ती गाडी सुटण्याची वेळ झाल्याने ती पकडण्याच्या नादात त्याने धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा धोका पत्करला. हातात फोन आणि बॅग असल्याने त्याचा तोल सुटून हा अपघात घडला, पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर या थरारक घटनेमागचं कारण समोर आलं.
Domestic Violence case: 20 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; तीन दिवस अर्ध्या चपातीवर ठेवल्याचा आरोप
लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका नवविवाहितेला हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे ...
या घटनेनंतर रेल्वे पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमोल दोंड यांनी पुन्हा एकदा प्रवाशांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, "प्रवाशांसाठी घाईपेक्षा स्वतःची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. ट्रेन पुन्हा मिळू शकते, पण एकदा गेलेला जीव परत येत नाही." त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न कोणीही करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. व्हिडिओ कॉल किंवा मोबाईलमध्ये गुंतून प्रवास करणं किती घातक ठरू शकतं, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.